स्फूर्ती योग
1) दंडासन (बाह्य कुंभक) : तीनवेळा वज्रासनात बसा, श्वास घ्या. नंतर श्वास सोडत दोन्ही हात डोक्याच्या वर पसरवा. श्वास बाहेर ठेवा. श्वासाची गरज लागेल तेव्हा श्वास घेत हात खाली घ्या. ही क्रिया तीनवेळा करा.
2) पंखासन - या स्थितीत श्वास आत रोखून धरा, तळवे मागे फिरवा, सातवेळा खांदे दाबून सोडा. अशी तीन आवर्तने करा.
3) कोपरापासून हात फिरवत गोल काढणे : हाताची बोटे खांद्यावर ठेवा, छातीपुढे कोपर जोडा. कोपर डोक्यावरून गोलाकार फिरवत पुढे आणा. प्रत्येक वेळी कोपर छातीपुढे जोडा. अशी तीन आवर्तने सरळ, तीन उलट दिशेने काढा.
4) तीर्यकासन : उभे राहून व पायात अंतर ठेवून, हात छातीसमोर बांधा. भरपूर श्वास खेचा. श्वास सोडत तीन ठिकाणी शरीर - कंबर, छाती व मान-शरीर डावीकडे फिरवा. डोळे डाव्या खांद्यावर स्थिर ठेवून, कमरेखालील शरीर थोडे उजवीकडे वळवून, पिळ अनुभवून समोर या. हीच क्रिया उजव्या बाजूस करा. दोन दोन आवर्तने. आसन स्थितीत पूर्ण वेळ बाह्य कुंभक करा. अतिशय उपकारक आसन.
प्राणायाम : वज्रासनात बसा : 1) आपला रक्तदाब जास्त असल्यास चंद्र नाडी प्राणायाम सातवेळा करा. रक्तदाब कमी असल्यास, सूर्य नाडी प्राणायाम सातवेळा करा. त्यानंतर दोन्ही स्थितींमध्ये अनुलोम-विलोम प्राणायाम (7द3) सातवेळा करा. आयाम अनुभवा. ही आवर्तने सकाळ, दुपार संध्याकाळ याच संख्येत क्रमाने करा.
नंतर ध्यान-1 : शांत बसून रक्तदाब जास्त असल्यास हातात वायुमुद्रा व कमी असल्यास ज्ञानमुद्रा लावून डोळे बंद करून श्वास सूक्ष्म होईपर्यंत श्वासावर लक्ष देणे.
रक्तदाब व हृदयविकारावर योगासने
जानूशिरासन, अर्धं - पश्चिमोत्तानासन, अर्ध-उष्ट्रासन.
शवासन-1 (कृपया सर्व चित्रात बघावे, या सर्व आसनांचा अभ्यास आपण पूर्वीच्या लेखांत केलेला आहे.)
नाद प्राणायाम (त्रिबंधात्मक, मुलाधारापासून ते नाभीपर्यंत) ईीीीउम् द 3,6,9,12 वेळा गरजेनुसार. अकाराचा उच्चार जास्त.
ध्यान-2 शरीराने व मनाने काहीही न करता बसणे. (स्वयंपरीक्षा) 3 मिनिटे.
- गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)