आपण सांधेदुखी यावर आतापर्यंतच्या काही भागांत योगोपचार बघितले. आता शरीरातील अदृश्य, पण परिणामी घातक अशा व्याधींकडे वळूया, ज्यांचे वेळेवर नियंत्रण न केल्यास जीवघेणे असे परिणाम भोगावे लागू शकतात. इंग्रजीत म्हणतात की, ’झीर्शींशपींळेप ळी लशीींंशी ींहरप र्लीीश.’ हे त्यासाठीच ब्रीदवाक्य ठरलं आहे. एवढ्या कठीण व्याधींवर योगोपचार आहे का? तर उत्तर माझ्या 24 वर्षे योगोपचाराच्या अनुभवातून ‘हो’ असेच आहे. दुष्परिणाम नसणारा औषधोपचार, निसर्गोपचार हा आवश्यक आहेच, त्यांचा योग्य परिणाम योगोपचाराने साध्य होतो.
रक्त घट्ट होऊ नये, याकरिता आहाराची पथ्ये पाळणे, हे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढीच दिनचर्या आणि नियमित योगोपचार व्यायाम तितकाच महत्त्वाचा आहे. तत्पूर्वी प्रथम रक्तदाब म्हणजे नेमके काय, ते समजून घेऊया.
रक्तदाब म्हणजे काय?
रक्तदाब म्हणजे आपल्या हृदयाने पंप केलेले रक्त रक्तवाहिन्यांमधून प्रवाहित होताना त्या भिंतींवर टाकणारा दाब होय. आपल्या रक्तदाबाचे मापन दोन संख्यांमध्ये केले जाते :
1. सिस्टोलिक दाब (उच्च दाब) : हृदय आकुंचन (लेपीींरलीं) होऊन रक्त पंप करताना जो दाब निर्माण होतो. सामान्यतः हे 120 ााकस पेक्षा कमी असावे.
2. डायास्टोलिक दाब (निम्न दाब) : हृदय विश्रांती घेत असताना (ीशश्ररुरींळेप) रक्तवाहिन्यांतील दाब. सामान्यतः हे 80 ााकस पेक्षा कमी असावे.
आदर्श रक्तदाब : 120/80 ााकस
उच्च रक्तदाब (कूशिीींशपीळेप) काय आहे?
जेव्हा रक्तदाब सतत 130/80 पेक्षा जास्त असतो.त्याचा हृदय, मेंदू, किडनी आणि डोळ्यांवर वाईट परिणाम करू शकतो.
लक्षणे : डोकेदुखी, चक्कर येणे, दृष्टी धूसर होणे, हृदय धडधडणे, थकवा किंवा चिडचिड
कमी रक्तदाब (कूिेींशपीळेप) म्हणजे काय?
जेव्हा रक्तदाब 90/60 ााकस पेक्षा कमी असतो.त्यामुळे शरीराच्या अवयवांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही.
लक्षणे : अशक्तपणा, थकवा, चक्कर, थंड हातपाय, धडधड किंवा धसका
हृदयविकार म्हणजे काय?
हृदयविकार म्हणजे आपल्या हृदयाशी संबंधित विविध आजारांचा समूह. यामध्ये मुख्यतः खालील आजार येतात :
1. कोरोनरी आर्टरी डिसीज (कार्डिओवास्कुलर डिसीज) : हृदयाला रक्तपुरवठा करणार्या रक्तवाहिन्या (कोरोनरी आर्टरीज) अडथळीत आल्यामुळे होणारा विकार. यामुळे छातीत दुखणे, छातीस दुखीपणा (एन्जाइना) किंवा हृदयविकाराचा झटका (मायोकार्डियल इन्फरक्शन) होऊ शकतो.
2. हृदयविकृती (हार्ट फेल्युअर) : हृदयाची पम्पिंग क्षमता कमी होणे, ज्यामुळे शरीरात अवशिष्ट द्रव साठतो आणि श्वास घेण्यात त्रास होतो.
3. अतालता (अॅरिदमिया) : हृदयाचे ठोके अनियमित होणे-खूप वेगाने (टॅकीकार्डिया), खूप मंद (ब्रॅडीकार्डिया) किंवा अगदी उधळणारे-गडबडीत असणे.
4. व्हाल्व्ह डिसीज : हृदयाच्या ढारांमधील (वाल्व्ह) अस्वस्थता-वाल्व्ह व्यवस्थित उघडत-बंद होत नसल्यामुळे रक्ताच्या प्रवाहात अडथळा.
5. पॉल्मोनरी हृदयविकार (रायट) : फुप्फुसांच्या रक्तवाहिन्यांतील ताणामुळे पुढच्या हृदयाच्या उजव्या कक्षात ताण वाढणे.
लक्षणे : छातीत तीव्र दुखणे, श्वास घ्यायला त्रास, जलद किंवा अनियमित हृदय ठोके, थकवा, पायाला सूज
प्रतिबंध आणि काळजी : संतुलित आहार (कमी तेल, कमी मीठ), नियमित योगोपचार, धूम्रपान व मद्यपान टाळणे, वेळोवेळी तपासणी, रक्तदाब व कोलेस्टेरोल नियंत्रण, हृदयविकाराच्या लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आपला काळजीपूर्वक आहार-विहार आणि नियमित तपासणी हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
रक्तदाब व हृदयविकारावर योगोपचार मुख्यत्वे प्राणायाम व विशिष्ट योगासने यांची पुढील भागात माहिती करुन घेऊया.
- डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक आहेत.)