मधुमेह हा रोग नाही, तर व्याधी आहे, जी रोगांना आमंत्रण देते, ज्यामध्ये हृदय, डोळे, किडनी या अवयवांच्या रोगाचा प्रामुख्याने समावेश होतो. ‘डायबेटिक न्युरोपॅथी’ हीपण एक जीवनातील स्वस्थता हरवून घेणारी व्याधी उद्भवते. अशी ही खूप प्रमाणात लहान, मोठ्या व्यक्तींना होणारी व्याधी का उद्भवते, त्याचा अभ्यास आधी करून मगच पुढे जाणे योग्य होईल.
मधुमेह का होतो?
मधुमेह म्हणजे शरीरातील ‘इन्सुलिन’ या संप्रेरकाची कमतरता किंवा ‘इन्सुलिन’ची अकार्यक्षमता, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
प्रमुख कारणे :
1. अनुवंशिकता (ॠशपशींळली) : जर आईवडिलांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना मधुमेह असेल, तर तो होण्याची शक्यता जास्त.
2. चुकीची जीवनशैली : सतत बसून काम करणे (शारीरिक हालचाल कमी), कमी झोप आणि मानसिक ताण, तंबाखू, सिगारेट, आणि मद्यपान
3. अनियमित आहार : खूप तेलकट, गोड, पॅकेट फूड आणि मैद्याचे पदार्थ, फायबर आणि प्रथिने कमी असलेला आहार
4. लठ्ठपणा (जलशीळीूं) : शरीरात चरबी अधिक असल्यामुळे इन्सुलिन योग्य प्रकारे काम करत नाही (इन्सुलिन रेझिस्टन्स)
5. वय वाढल्यावर : विशेषतः 40 वर्षांनंतर शरीरातील चयापचय क्रिया मंद होते
6. अंतःस्रावी ग्रंथींचे विकार : थायरॉईड, अॅड्रिनल ग्रंथी यांचे विकार असतील तर मधुमेह होऊ शकतो
मधुमेहाचे प्रकार :
1) टाईप-1 मधुमेह : लहान वयात होतो
शरीर इन्सुलिन तयारच करत नाही. इन्सुलिन इंजेक्शन लागते.
2) टाईप-2 मधुमेह : हा मोठ्या वयात होतो. शरीर ‘इन्सुलिन’ तयार करतं, पण ते योग्यरित्या काम करत नाही. जीवनशैली आणि आहारामुळे वाढतो.
3. गर्भावस्थेतील मधुमेह (ॠशीींरींळेपरश्र ऊळरलशींशी) : गर्भवती महिलांमध्ये होतो, पण नंतर काही वेळाने कमी होऊ शकतो
थोडक्यात, मधुमेह ही एक जीवनशैलीशी निगडित व्याधी आहे, जी चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, मानसिक तणाव, अनुवंशिकता आणि वाढते वय यांमुळे होते. योग्य काळजी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.
व्यायाम प्रकारात चालणे व योगोपचार हेच मुख्यत्वे उपयोगी पडतं. पैकी चालणे या विषयावर आज अभ्यास करू. दिवसातून कमीत कमी 45 मिनिटे झपाट्याने चालणे (लीळीज्ञ) महत्त्वाचे व फायदेशीर आहे. अळमटळम करत, गप्पा मारत चालणे उपयोगाचे नाही. ज्या 45 मिनिटांमधील 15 मिनिटे काळजीपूर्वक नंग्या पायाने हिरवळीवर चालणे, तळ पायाला मुंग्या येणे, पायांच्या नसा आकडणे यावर उपयुक्त आहे. हिरवळीवर (ङरुपी) वर चालताना सूर्यप्रकाशात दिवसा चालावे म्हणजे गवतातील किडे, कीटक, विषारी जीव यांची बाधा होणार नाही. मधुमेह असणार्या व्यक्तींनी जेवणानंतर शतपावली दहा मिनिटे घरात शक्यतो चप्पल न घालता उघड्या पावलाने करावी व नंतर चार-बारा मिनिटे नाभिस्थानावर ‘रं’ वर्णाचा वज्रासनात बसून व हातांमध्ये प्राण मुद्रा लावून उच्चार करावा. ज्यांची देवावर व मं शक्तीवर विश्वास आहे, त्यांनी ज्या मंत्रामध्ये ‘रं’ बीजाक्षर आहे, त्याचा मन नाभिस्थानावर ठेवून जप करावा. (आपल्या डॉक्टरांच्या-वैद्यांच्या सल्ल्यानुसार घेत असलेल्या औषधांवर हा पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे.) प्राण मुद्रा आणि वज्रासन चित्रात बघावे.
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)
डॉ. गजानन जोग
9730014665