मुंबईच्या किनारी दुर्मीळ ख्रिसमस फ्रिगेटबर्डची वारी

    28-Jul-2025
Total Views | 30
seabird in mumbai


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मुंबईतील पक्षीनिरीक्षकांनी रविवार दि. २७ जुलै रोजी शहरातील दक्षिणेकडील भागातून दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली (seabird in mumbai). त्यांनी दक्षिण मुंबईच्या आकाशातून लेसर फ्रिगेटबर्ड, ख्रिसमस आयलंड फ्रिगेटबर्ड, विल्सनस् स्ट्रोम पेट्रेल, वाईट चिक टर्न नावाच्या दुर्मीळ समुद्री पक्ष्यांची नोंद केली. (seabird in mumbai)
 
 
 
समुद्री पक्षी हे खोल समुद्रामध्ये अधिवास करण्यासाठी ओळखले जातात. ते सहसा मुख्य भूमीवर येत नाहीत. ते खोल समुद्रामध्ये अधिवास करतात. तिथल्या बेटांवरच या पक्ष्यांची वीणवसाहत असते. मात्र, पावसाळी हंगामात जोरदार वाऱ्यामुळे हे समुद्री पक्षी मुख्य भूमीवर फेकले जातात. यातील काही पक्षी जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेले पाहायला मिळतात, तर काही पक्षी हे आकाशात वाऱ्यावर घिरट्या घालताना नजरेस पडतात. यांमधीलच काही दुर्मीळ समुद्री पक्षी सध्या मुंबई महानगर परिसरात नजरेस पडत आहेत. खास करुन किनारी भागांमध्ये हे पक्षी प्रामुख्याने दिसून येत आहेत. ख्रिसमस आयलंड फ्रिगेटबर्ड, लेसर फ्रिगेटबर्ड, वाईट चिक टर्न, विल्सनस् स्ट्रोम पेट्रेल, बायडल्ड टर्न यांसारखे पक्षी रविवारी दिसल्याची माहिती पक्षीनिरीक्षक मयुरेश परब यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली.
 
 
 
दक्षिण मुंबईतील कुलाबा, गेट आॅफ इंडिया, ससून डाॅक, रेडिओ क्लब या भागांमध्ये प्रामुख्याने हे पक्षी दिसत आहेत. त्यामुळे या पक्ष्याचे छायाचित्र टिपण्यासाठी पक्षीनिरीक्षक दक्षिण मुंबईत येत्या काही दिवसात गर्दी करणार आहेत. लेसर फ्रिगेटबर्ड हा पक्षी ७५ सेमीचा म्हणजेच जवळपास २ फूट लांबीचा असला तरी, तो फ्रिगेटबर्ड प्रजातीमधील आकाराने सर्वात लहान पक्षी आहे. हिंद महासागर आणि पॅसिफिक महासागरात हा पक्षी आढळतो. ख्रिसमस आयलंड फ्रिगेटबर्ड हा लेसर फ्रिगेटबर्ड पेक्षा आकाराने मोठा पक्षी असून तो हिंद महासागरातील केवळ ख्रिसमस बेटांवर प्रजनन करतो. प्रजनन हंगामाच्या व्यतिरिक्त हा पक्षी सुमारे १० हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करत असल्याच्या नोंदी आहेत.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

“सध्याच्या काळातील संघर्ष बघता, सगळ्या घटनांकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. यासाठी सांस्कृतित राष्ट्रकुलाचा विचार व्हायाला हवा “ असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ४ ऑक्टोबर रोजी वैभव केळकर आणि डॉ. मेघना दलाल यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन नें प्रकाशित केलेल्या "पार्थसूत्र" या मराठी आणि "Bow & Beyond" या इंग्लिश पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे पार पडले. या कार्यक्र..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121