हवामान क्षेत्राची आवड म्हणून अभ्यास करत जनसेवा म्हणून हवामानाचे अंदाज २४ तास वर्तवणार्या ऋषिकेश आग्रे यांच्याविषयी...
Read More
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. विशेषतः एक्स या प्लॅटफॉर्मवर ते दररोज रात्री आपली दिवसाची सांगता खास "T-" या क्रमांकासह ट्विट करतात. त्यांच्या या खास ट्विटसचा एक वेगळा फॅनबेस आहे. पण अमिताभ बच्चन गेल्या २० दिवसांपासून दररोज एक ट्विट करत आहेत, पण हे ट्विट पूर्णपणे रिकामं असतं – फक्त "T-" असा क्रमांक असतो आणि त्याशिवाय काहीही नाही.
आयपीएलच्या रंगतदार सामन्यात १४ वर्षीय वैभव सुर्यवंशीने केवळ ३८ चेंडूंमध्ये झंझावाती १०१ धावा करत संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या दमदार खेळीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, स्वत: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही त्याच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे.
लेखक आणि गीतकार जावेद अख्तर कायमच चर्चेचा भाग असतात. याशिवाय सोशल मीडियावरही बऱ्यापैकी ते सक्रिय असतात. विविध विषयांवर ते आपली मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात. पण आता त्यांची सोशल मिडियावर व्यक्त होण्याची पंचायत झाली असून त्यांचं एक्स अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळत आहे. मुळात जावेद यांनी स्वत:च त्यांचं सोशल मिडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर सर्वात जास्त सर्च होणारे व्यक्ती आहेत. हॅशटॅग ट्रॅकिंग टूल, ट्विट बाइंडरच्या अहवालात ही माहिती पुढे आली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय राजकारणी आहेत.
आपल्या सोयीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता या प्रकरणी निशाण्यावर आले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली. ट्रुडो यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ट्विटरने दणका दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवार गटाकडून ट्विटरचे एक नवीन अकाऊंट NCPspeaks_official असे तयार करण्यात आले होते. हे राष्ट्रवादीचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. ट्विटरचे नियम न पाळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादा गटाला मोठा धक्का बसला आहे.
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार X (पूर्वीचे ट्विटर)चे संस्थापक एलोन मस्क यांनी ब्लॉक फिचर रद्दबादल करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले. या फिचरप्रमाणे युजर आता दुसऱ्या खात्यांना ब्लॉक करू शकणार नाहीत. अर्थात यात ते विशिष्ट युजर तुम्हाला डायरेक्ट इनबॉक्स मेसेज पाठवू शकले नसले तरी त्यांचा पोस्ट व कमेंट डिलिट करता येणार नाहीत. नवीन फिचर प्रमाणे नको असलेल्या युजर्सला ग्राहक म्युट करू शकतील परंतु त्या संबंधित व्यक्तीला आपल्या ट्विट,कमेंट दिसतील त्या आपण मात्र लपवू शकणार नाही. युजर्सने जर तुमच्या एखाद्या पोस्टवर कम
देशभरात अनेक घटना घडत असून हिंसाचार वाढताना दिसत आहे. अलीकडेच हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार भडकला होता. या हिंसाचारामुळे अभिनेता गोविंदा एका वादात अडकला आहे. गोविंदाने या प्रकरणाबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट समोर आल्यानंतर एकीकडे गोविंदाला ट्रोल केले जात असून दुसरीकडे गोविंदाने त्याचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे सांगितले आहे.
ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलले आहे. आजपासून ट्विटरचे नाव एक्स असेल. आता एक्स.कॉम उघडल्यावर, तुम्ही ट्विटरवर पोहोचाल. नावासोबतच ट्विटरचा लोगो ही बदलण्यात आला आहे. आता तुम्हाला पक्ष्याच्या जागी एक्स (X) दिसेल.
एलॉन मस्क यांच्या मालकीच्या ट्विटर या प्रभावशाली समाजमाध्यमाने केलेल्या भविष्यवाणीमुळे पाकची डोकेदुखी वाढली आहे. त्याचे झाले असे की, रविवारी या भागातील लोकांनी पाकिस्तान सरकारच्या अधिकृत हॅण्डलमधील घडामोडी पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले, तेव्हा हे हॅण्डल ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश झळकला. यासोबतच हा भाग भारताचा भाग असलेल्या काश्मीर अंतर्गत असल्याचे सांगण्यात आले.
ट्विटरचे मालक बनल्यानंतर एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक बदल केले आहेत. यावेळी त्यांनी अनवेरिफाइड यूजर्ससाठी ट्विट मर्यादा निश्चित केली आहे. त्यांनी केलेल्या नियमानुसार, वेरिफाइड यूजर्सना १०,००० ट्विट वाचण्याची संधी मिळेल पंरतू अनवेरिफाइड यूजर्सना फक्त १००० ट्विट पाहण्याची संधी मिळणार आहे. हा नियम तात्पुरता लागू करण्यात आला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटरला जबरदस्त धक्का दिला आहे. फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान केंद्र सरकारने ट्विटरला ३९ अकाउंट ब्लाक करण्याचे आदेश दिले होते. याचं आदेशाविरुध्द ट्विटरने त्यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मवर एक मोठा विक्रम केला आहे. मंगळवारी, १३ जून रोजी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर सीएम योगींच्या फॉलोअर्सची संख्या २५ दशलक्षांपर्यंत पोहोचली. म्हणजेच २५ दशलक्षाहून अधिक लोक यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करत आहेत. इतके फॉलोअर्स असलेले योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो आहे, तपासाच्या सूचना दिल्या आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्यांच्याबदल आम्हा सर्वांनाच आदर आहे. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. आवश्यकता असल्यास सुरक्षा व्यवस्थेत वाढही करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. असं शिंदे पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ५०६ अंतर्गत धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा शाखेने गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. "तुमचाही दाभोळकर करू", अशा स्वरुपातील धमकी आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.
मुंबई : मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार आहे, अशी पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना निनावी धमकी मिळाली असून यंदा ही धमकी फोन किंवा ईमेलवरुन नाही तर ट्विटरवरुन देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून तत्काळ याप्रकरणी तपासास सुरवात करण्यात आली असून यासंबंधी अधिक चौकशी देखील करण्यात येत आहे.
इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी असलेली मेटा लवकरच एक नवीन अॅप लाँच करण्याच्या तयारीत आहे. मेटाने ट्विटरसारखे एक अॅप लाँच करण्याची तयारी केली आहे. या अॅपमध्ये ट्विटरसारखे नवीन फीचर्स असणार आहेत. फोटो, मजकूर, ट्विट शेअर लिंक्स त्याचबरोबर व्हिडीओ यासारखे फीचर्स आपल्याला या इंस्टाग्रामच्या नव्या ट्विटरमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
ट्विटरने दि.२१ एप्रिल रोजी एका नवीन नियमांची अंमलबजावणी करायला सुरूवात करायला सुरूवात केली होती . या नियमाअतंर्गत ट्विटर ब्ल्यू टीक आता फक्त त्यांच लोकांना मिळणार आहे. ज्यांनी ट्विटरकडे पैसे भरले असतील. त्यामुळे अनेक नेते, अभिनेते यासांरख्या अनेकांचे ब्ल्यू टीक गेले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी दि.२१ एप्रिल रोजी ट्विट केले की, “ए ट्विटर भैय्या ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्हीही पैसे भरले आहेत…म्हणून आमच्या नावासमोर जे निळे कमळ आहे, ते प्लीज परत लावा भाऊ, म्हणजे लोकांना कळेल की आम्ही अमिताभ बच्चन आहोत",
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेले विधान त्यांना महागात पडत आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर त्यांची खासदारकी गेली. आता आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना ब्रिटनच्या न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिला आहे.ललित मोदींनी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून हा इशारा दिला आहे. वास्तविक, ललित मोदींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा राहुल गांधी यांना नुकतेच मोदी अपमान प्रकरणी दोषी ठरवून गुजरातच्या न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनाव
आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात जगभरात सर्वत्रच कामगार कपात होताना दिसून येते. याउलट भारत हा देश तरुणाईला काम देणारा देश, अशी नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करत आहे. हे नेमके कसे साध्य झाले, ते समजून घ्यायला हवे.
'समाजकंटक’ हा शब्द सगळ्यांनाच परिचित. त्यात हल्लीच्या ‘स्मार्ट’ युगात नवनवे तंत्र आणि प्रणाली येत असल्याने नवनव्या शब्दांचीही भर पडत आहे. यात ‘माध्यमकंटक’ हा एक नवा शब्द गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहे. माध्यमकंटकाचे जनक काहीतरी आक्षेपार्ह मजकूर तयार करून किंवा फोटो अथवा व्हिडिओत फेरफार करून विविध प्रकारच्या समाजमाध्यमांत ते ‘व्हायरल’ करत असतात.
मायक्रोब्लॉगिंग साईट् ट्विटरने खरेदी केल्यावर एलन मस्कने अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता एलन मस्कने भारतातील दोन ट्विटरचे कार्यालय बंद केले आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरचे भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू अशा ठिकाणी कार्यालय होते. मात्र आता दिल्ली आणि मुंबईची कार्यालय बंद करण्यात आले आहेत.
सध्या सुरु असलेल्या महाराष्टू - कर्नाटक सीमावादावर सोशल मिडियात आपले मत प्रदर्शित करणाऱ्या ठाणे भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया संयोजिकेच्या ट्विटरवर काही जणांनी अश्लील शिविगाळ असलेला मजकुर पोस्ट केला होता. याविरोधात त्यांनी संबधितांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
ट्विटरवर ‘घरवापसी’ करायची का आणि करायची तर केव्हा करायची, याबाबतचा आपला निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी उघड केला नसला तरी ते फार काळ ट्विटरपासून दूर राहू शकतील, असे वाटत नाही. ट्विटरने ट्रम्प यांचे खाते पुनर्प्रस्थापित करून अन्य समाजमाध्यमांसाठी रस्ता मोकळा केला आहे.
ट्विटरवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे अकाऊंट्स पुन्हा बहाल केले. सीईओ एलन मस्क यांनी त्यांचं जोरदार स्वागत केले. मात्र, ट्रम्प यांनी ट्विटर वापरण्यास अद्याप तयारी दर्शविलेली नाही. ट्रम्प यांच्या मते, "आपण स्वतःच्या टुथ सोशलचा वापर करणेच कायम ठेवणार आहेत. या सोशल मीडियाची तुलना ट्विटरच्या परफॉर्मन्सशी केली आहे. ट्विटरपेक्षा सोशल टुथचं एंगेजमेंट अधिक चांगलं आहे, असे म्हणत मस्क यांनाही टोला लगावला आहे.
‘स्टार्टअप’ संस्कृतीची एक काळी बाजूही आहे. यात पैसे लावणारे लोक इथल्या यशावर सट्टा लावत असतात. दुसर्या बाजूला ही उत्पादने चालतात किंवा चालत नाहीत. ट्विटरच्या आजच्या स्थितीला ट्विटर चालविणारी मंडळीही कारणीभूत आहेत.
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान असतील. पण नेटकऱ्यांकडून मात्र क्रिकेटर आशिष नेहरा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. खरे पाहायला गेले तर दोघांच्याही चेहऱ्यांमध्ये साम्यता आहे. एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी ऋषी सुनक आणि बॉलिवूड अभिनेता जिम सरभ यांच्यात देखील तुलना केली आहे. सोशल मीडियावर सध्या काही नेटकऱ्यांनी आशिष नेहराचे मोदी, विराटसोबतचे फोटो शेअर करत कमेंट केली.
काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेच्या पाचव्या दिवशी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या पोस्टमध्ये आरएसएसचा खाकी जळताना दिसत होता
बड्या उद्योग समूहांनी आपले प्रकल्प परराज्यात हलवल्याने झालेल्या आर्थिक नुकसानीला तत्कालीन सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, असे उद्योजकांनी म्हटले आहे.
राहुल गांधींनी काँग्रेसाध्यक्षपदाला नकार देण्यामागे किंवा त्यापासून पलायन करण्यामागे अनेक कारणे आहेत. राहुल गांधी स्वतः पूर्णवेळ राजकारणी नाहीत. उद्धव ठाकरेंप्रमाणेच राजकारणापेक्षाही निराधार, निरर्थक बडबड करण्यालाच ते राजकारण समजतात. भाजपशासित राज्यात काही झाले की, ट्विटरवर दोन शब्द टंकित केले की, झाले आपले काम असे त्यांना वाटते.
करिना कपूरनं आपल्या गीतच्या भूमिकेविषयी आता काहीसं असं विधान केलंय की त्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या २० जुलै रोजी झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगाच्या शिफारसींना मान्यता दिल्यानंतर राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे
वय हा फक्त एक आकडा आहे. धैर्य आणि विश्वास असेल, तर यशाला गवसणी घालणे फार अवघड नाही. जाणून घेऊया ९४व्या वर्षी फिनलंडमध्ये भारताची शान वाढविणार्या भगवानी देवी डागर यांच्याविषयी...
एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर काही बंडखोर आमदारांच्या घरावर हल्ले करण्यापासून त्यांचे बॅनर, फोटोला काळे फासण्याचे प्रकार राज्यात काही ठिकाणी निदर्शनास आले. संजय राऊतांसारख्या नेत्यांनी तर तोंडाचे गटार उघडून शिवसेनेची होती नव्हती अब्रूही धुळीस मिळवली. पण, विधानसभा अध्यक्ष निवड आणि बहुमत चाचणीनंतर बहुतांश आमदार हे आता आपापल्या मतदारसंघात परतले आहेत.
‘अल्ट न्यूज’चा सह-संस्थापक आणि कथित ‘फॅक्ट चेकर’ मोहम्मद झुबेर यास हिंदूंच्या भावना दुखावणारे ट्विट केल्याप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात प्रत्येक क्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना अभिवादन केले आणि त्यांच्या ''सक्षम'' नेतृत्वाखाली राज्याने प्रगतीची नवीन उंची गाठली आहे, असे त्यांचे कौतुक केले. गोरखपुरचे पाच वेळा खासदार राहिलेले योगी आदित्यनाथ, यांनी २०१७ मध्ये भाजप नेतृत्वाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर, संन्यासी राजकारणी यांनी राजकारणात वेगाने प्रगती केली आहे.
भारतीय लष्कराचे दक्षिण कमांडचे लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन आणि भारतीय नौदलाचे पश्चिमी कमांडचे फ्लॅग ऑफिसर व्हाइस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी बुधवार, दि. २४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या सीएमओ महाराष्ट्र (@CMOMaharashtra) या ट्वीटर पेजवर पोस्ट केली. मात्र अजेंद्र बहादूर सिंग यांच्या नावात केलेली चूक लक्षात येताच मुख्यमंत्री कार्यालयाने ती पोस्ट डिलिट केल्याचे समोर आले आहे.
१४ एप्रिल रोजी ट्विटर कंपनीची मालकी मिळवल्यानंतर आत एलॉन मस्कने ट्विटरच्या वापरकर्त्यांना झटका दिला आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले' चित्रपटातल्या असरानी जेलरसारखी झाली आहे, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.
‘टेस्ला’, ‘स्पेस एक्स’ या कंपनीचा संस्थापक एलॉन मस्क आता ‘ट्विटर’वर आपले एकहाती वर्चस्व प्रस्थापित करणार, हे निश्चित! हा करार जरी भविष्यात आकाराला येणार असला तरी या व्यावसायिक समीकरणामुळे ‘ट्विटर’वरील विचारस्वातंत्र्याची गणिते बदलतील का? ‘ट्विटर’च्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पक्षी आता समाजमाध्यमांच्या डिजिटल विश्वास मुक्त विहार करेल का? यांसारख्या प्रश्नांचा उहापोह करणारा हा लेख...
प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क elon musk यांनी ट्विटर ताब्यात घेण्याच्या घोषणेमुळे आता कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी उफाळून आल्याचे दिसून येते. कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कंपनीचे भविष्य अंधारात असल्याची चिंता व्यक्त केली आहे. elon musk
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एकामागोमाग एक अशा तब्बल १४ ट्विट्सचा भडिमार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. एका ‘ट्विट थ्रेड’च्या माध्यमातून फडणवीसांनी शरद पवार यांनी वेगवगेळ्या विषयांवर केलेले भाष्य आणि त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवत त्यांना ‘आरसा’ दाखवला.
“हिंदू देवी-देवतांबद्दल निंदनीय आणि आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करणार्या खात्यांवर कारवाई का केली जात नाही,” असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी ट्विटरला विचारला
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन यांनी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गांभीर्याने विचार करत आहेत अशी माहिती त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे
नेत्यांची शाळा घेताना प्रत्यक्षात राहुल गांधी कोणत्या वर्गात येतात? २४ तास काम करणाऱ्या की, ‘एसी’मध्ये बसून भाषण ठोकणाऱ्या? की ट्विटरवर टिवटिवाट करणाऱ्या?
हॉलिवूडच्या सुप्रसिध्द अभिनेत्री जूलिया रॉबर्ट्स यांनी हिंदू धर्माविषयी केेलेले विधान सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. सोमवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी 'हेरिटेज गाय' या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. यातून त्यांनी हिंदू धर्माबद्दल असलेली आस्था आणि प्रेम व्यक्त केल्याचे दिसून येते.
१ फेब्रुवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब खात्याने १० मिलियन म्हणजेच १ करोड सब्सक्राईबर्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख ठरले आहेत.