राहुल गांधींना ब्रिटनच्या न्यायालयात खेचणार

    30-Mar-2023
Total Views | 106
lalit-modi-on-rahul-gandhi-modi-surname-row-updates


लंडन
: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन केलेले विधान त्यांना महागात पडत आहे. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर त्यांची खासदारकी गेली. आता आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवत त्यांना ब्रिटनच्या न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिला आहे.ललित मोदींनी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करून हा इशारा दिला आहे. वास्तविक, ललित मोदींचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा राहुल गांधी यांना नुकतेच मोदी अपमान प्रकरणी दोषी ठरवून गुजरातच्या न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींना संसदेतून अपात्र ठरवण्यात आले आणि त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर आरोप करत असून सत्ताधारी भाजपच्या वतीने राहुल यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे.दरम्यान ललित मोदी यांनी एकामागून एक ट्विट करत, “मला कोणत्या आधारावर फरार म्हटले जात आहे, मला कधीच दोषी ठरवण्यात आलेले नाही,” असा प्रश्न आयपीएलचे संस्थापक मोदी यांनी केला.ललित मोदी यांनी काँग्रेस पक्षावरही जोरदार हल्ला चढवला आहे. ललित मोदी म्हणाले की, “विरोधकांकडे काहीच काम नाही, त्यामुळे एकतर ते चुकीची माहिती ठेवतात किंवा सूडाच्या भावनेने असे करतात”.

ललित मोदींनी आपल्या ट्विटमध्ये देशातील अनेक नेत्यांना टॅग करत गांधी परिवाराची विदेशात किती संपत्ती आहे याचा पुरावा माझ्याकडे असल्याचे म्हटले आहे.माझ्याकडे सर्व पुरावे आणि पत्ते आहेत. मी पुराव्यासाठी या सर्व मालमत्तांचे फोटो आणि पत्ते पाठवू शकतो. देशातील जनतेला मूर्ख बनवू नका, देशावर राज्य करण्याचा आपला हक्क आहे, असे गांधी परिवाराला वाटते.२०१९ च्या निवडणुकीच्या रॅलीत राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वक्तव्यामुळे एका विशिष्ट समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या विधानाचा संदर्भ देत ललित मोदी म्हणाले की, मी या प्रकरणाबाबत ब्रिटनच्या न्यायालयात खटला दाखल करणार आहे, परंतु सत्य हे आहे की जगाला माहीत आहे की भारताची पाच दशके दिवसाढवळ्या गांधी घराण्याने लूट केली आहे, असा हल्लाबोलही ललीत मोदी यांनी केला आहे.या प्रकरणी ललीत मोदी ब्रिटनच्या न्यायालयात दाद मागणार असल्याने राहुल गांधी यांना ‘मोदी आडनावा’वरुन केलेले वक्तव्य पुन्हा एकदा भोवणार असल्याचे दिसते.
मी राहुल गांधी यांना ताबडतोब ब्रिटनमधील न्यायालयात नेण्याचा निर्णय घेतला आहे. मला खात्री आहे की त्यांना काही ठोस पुरावे समोर आणावे लागतील.(ललित मोदी, संस्थापक-आयपीएल)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121