नवी दिल्ली: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे सीईओ एलॉन यांनी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार करण्याचा गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. ट्विटरवर त्यांना एका व्यक्तीने त्यांना या बद्दल प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देत असताना त्यांनी ट्विटरबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
मस्क यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही "असा एखादा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तयार कराल का? की जिथे लेखनाचे, बोलण्याचे स्वातंत्र्य असेल." यावर त्यांनी ट्विटर लोकशाहीच्या तत्वांचे पालन करण्यात अपयशी ठरत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे असा एखादा प्लॅटफॉर्म आणण्याचा विचार करेन असे उत्तर त्यांनी दिले होते. काही दिवसांपूर्वी मस्क यांनी ट्विटर लोकशाहीच्या तत्वांचे पालन करतो का? या बद्दल एक पोल घेतला होता. ज्यामध्ये ७० टक्के लोकांनी नाही असे उत्तर दिले होते.