योगींचा डिजीटल विक्रम! फॉलोअर्सची संख्या २.५ कोटी पार
14-Jun-2023
Total Views |
उत्तरप्रदेश : यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डिजीटल प्लॅटफॉर्मवर एक मोठा विक्रम केला आहे. मंगळवारी, १३ जून रोजी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर सीएम योगींच्या फॉलोअर्सची संख्या २५ दशलक्षांपर्यंत पोहोचली. म्हणजेच २५ दशलक्षाहून अधिक लोक यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ट्विटरवर फॉलो करत आहेत. इतके फॉलोअर्स असलेले योगी आदित्यनाथ हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.
योगी पहिल्यांदा ट्विटरवर सप्टेंबर २०१५ मध्ये आले होते. ते तेव्हा खासदार होते. २०१७ मध्ये यूपीचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था आणि सुशासन संदर्भात अनेक कामे केली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता खूप वाढली. ते अनेकदा त्यांच्या कामाची शैली आणि कृतीमुळे चर्चेत असतात.
आठ वर्षांत योगी आदित्यनाथ यांच्या ट्विटरवर २५ मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर सर्वोच्च नेत्यांमध्ये योगी यांचे ट्विटरवर एवढ्या मोठ्या संख्येने फॉलोअर्स आहेत.