‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण – भाजपची काँग्रेसवर टिका

    29-Apr-2025
Total Views |
‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण – भाजपची काँग्रेसवर टिका

नवी दिल्ली,  पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारे पोस्टर शेअर केले आहे. भाजपने यावर प्रत्युत्तर देत काँग्रेसला लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस असे म्हणून ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण असल्याचे म्हटले आहे.

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने समाजमाध्यम एक्सवर एक पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदींचे डोके आणि हात आणि पाय गायब आहेत. पोस्ट शेअर करताना काँग्रेस पक्षाने लिहिले, "जबाबदारीच्या वेळी गायब."

पोस्टर्स शेअर केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर प्रत्युत्तर दिले आहे. भाजपने एक्सवर म्हटले की, काँग्रेसने 'सर तन से जुदा' या अतिरेकी घोषणा त्यांचे धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे. काँग्रेस पक्ष आता मुस्लिम लीग २.० झाला असून त्यांचे नैराश्य दिवसेंदिवस ठळक होत आहे. पाकिस्तान आणि त्याचा मित्र काँग्रेस पंतप्रधानांना हव्या तितक्या धमक्या देऊ शकतात. मात्र, नवीन भारत झुकणार नाही आणि तुटणार नाही. दहशतवादाला बिर्याणीने नाही तर गोळ्यांनी उत्तर दिले जाईल. हे निर्णायक नेतृत्वाचे युग आहे, असेही भाजपने म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केला आहे.