मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अवस्था 'शोले' चित्रपटातल्या असरानी जेलरसारखी झाली आहे, अशी दर्शवणारी एक पोस्ट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टद्वारे केली आहे. त्यांच्या ट्विटर हँडेलवरून एक मीम शेयर केला होता, त्या मीममध्ये 'शोले' या चित्रपटातील जेलर असरानी म्हणत आहेत कि, 'अर्धे भाजपवर तुटून पडा, अर्धे मनसेवर तुटून पडा, मी घरीच बसतो' अशी मुख्यमंत्र्यांशी तुलना केली आहे.