मुंबई : शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम ५०६ अंतर्गत धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा शाखेने गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. "तुमचाही दाभोळकर करू", अशा स्वरुपातील धमकी आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती.
मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची तक्रार केली होती. एका सोशल मीडिया अकाऊंटद्वारे ही धमकी देण्यात आली. धमकीसोबत शरद पवारांना शिव्याही देण्यात आल्या. या प्रकरणात पोलीसांनी तपास करण्याची सुरुवात केली आहे.