खलिस्तानी समर्थक जस्टिन ट्रूडोंना एलॉन मस्क यांनी झापलं!
02-Oct-2023
Total Views | 577
मुंबई : आपल्या सोयीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आता या प्रकरणी निशाण्यावर आले आहेत. टेस्ला आणि स्पेसएक्सचे सीईओ एलॉन मस्क यांनी सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका केली. ट्रुडो यांच्यावर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मस्क यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.
त्यांनी ट्रुडोच्या भूमिकेचे वर्णन 'लज्जास्पद' असे केले. कॅनडाच्या सरकारने ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी नोंदणी अनिवार्य केल्यानंतर मस्क यांनी ही प्रतिक्रिया दिली. ट्रुडो सरकारवर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात काम केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, कॅनडाच्या सरकारने, ट्रक चालकांचे आंदोलन रोखण्यासाठी आणीबाणी लागू केली होती.
काही दिवसांपूर्वीच दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. त्याच्या आरोपानंतर दोन्ही देशांमध्ये राजनैतिक वाद सुरूच आहे. भारतात झालेल्या जी-२० शिखर परिषदेनंतर ट्रुडो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली खलिस्तानी दहशतवाद्यांचे समर्थन केले होते.