मुंबई-दिल्लीतील ट्विटरच्या कार्यालयाला टाळं! उरले फक्त तीन कर्मचारी!
17-Feb-2023
Total Views | 134
27
नवी दिल्ली : मायक्रोब्लॉगिंग साईट् ट्विटरने खरेदी केल्यावर एलन मस्कने अनेक धक्कादायक निर्णय घेतले. आता एलन मस्कने भारतातील दोन ट्विटरचे कार्यालय बंद केले आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे आदेश दिले आहेत. ट्विटरचे भारतात मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू अशा ठिकाणी कार्यालय होते. मात्र आता दिल्ली आणि मुंबईची कार्यालय बंद करण्यात आले आहेत.
पंरतू बंगळुरूचे कार्यालय हे बंद करण्यात आलेले नाही. पण बंगळुरूच्या कार्यालयातील कर्मचारी हे आपला दैनंदिन अहवाल अमेरिकेतील कार्यालयाला सादर करतात आणि महत्तवाचीबाब हे कार्यालय भारतीय संघाचा भाग नाही. सीएनबीसीच्या सर्वक्षणानुसार ट्विटरच्या भारतातील कार्यालय फक्त तीन कर्मचारी रहिलेत.
ब्लूमबर्गच्या सर्वक्षणानुसार,एलन मस्क हा ट्विटरचे खर्च कमी करण्यासाठी कंपनीच्या नियमात बदल करत आहे. तसेच ट्विटरला २०२३ पर्यत अर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी हे बदल आहेत. त्यामुळेच कर्मचारी कपात एलन मस्क यांनी केली आहे आणि आता ट्विटरने भारतातील दोन कार्यालये बंद केलेली आहेत. सीएनबीसीच्या सर्वक्षणानुसार आतापर्यत भारतातील ९० टक्के म्हणजेच जवळजवळ २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.