शशी थरूर आणि काँग्रेसमधील अंतर आणखी वाढले

    21-Jul-2025   
Total Views |

नवी दिल्ली,
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी रविवारी पुन्हा एकदा त्यांच्याच पक्षाचे नेते शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, जोपर्यंत थरूर राष्ट्रीय सुरक्षेबाबतची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत त्यांना तिरुअनंतपुरममधील कोणत्याही काँग्रेस कार्यक्रमात आमंत्रित केले जाणार नाही.

मुरलीधरन म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणी समितीचे (सीडब्ल्यूसी) सदस्य असलेले थरूर आता पक्षाचा भाग मानले जात नाहीत. थरूर यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करायची हे पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व ठरवेल असे त्यांनी सांगितले. मुरलीधरन म्हणाले, जोपर्यंत थरूर त्यांची भूमिका बदलत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांना तिरुवनंतपुरममध्ये आयोजित केलेल्या कोणत्याही पक्षाच्या कार्यक्रमात आमंत्रित करणार नाही. ते आमच्यासोबत नाहीत, त्यामुळे त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

यापूर्वी, मुरलीधरन यांनी थरूर यांच्यावर एका सर्वेक्षणावरून टीका केली होती ज्यामध्ये थरूर यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात आवडते घोषित करण्यात आले होते. मुरलीधरन म्हणाले होते की, त्यांनी आधी ते कोणत्या पक्षात आहेत हे ठरवावे.