ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनले, पण शुभेच्छांचा वर्षाव आशिष नेहरांवर

    25-Oct-2022
Total Views |

ashish nehra 
 
 
मुंबई : भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे पुढील पंतप्रधान असतील. पण नेटकऱ्यांकडून मात्र क्रिकेटर आशिष नेहरा यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. खरे पाहायला गेले तर दोघांच्याही चेहऱ्यांमध्ये साम्यता आहे. एवढंच नाही तर काही नेटकऱ्यांनी ऋषी सुनक आणि बॉलिवूड अभिनेता जिम सरभ यांच्यात देखील तुलना केली आहे. सोशल मीडियावर सध्या काही नेटकऱ्यांनी आशिष नेहराचे मोदी, विराटसोबतचे फोटो शेअर करत कमेंट केली.
 

ashish nehra 
 
 
'आशिष नेहरा यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे', असे लिहीत एका नेटकऱ्याने आशिष नेहरा यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
 
 
 
ashish nehra
 
 
तर एका नेटकऱ्याने आशिष नेहरासोबतचा विराट कोहलीचा बालपणीचा फोटो शेअर करत 'इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक युवा विराट कोहलीला सामनावीर पुरस्कार देत आहेत. द्वेष करणारे त्याला आशिष नेहरा म्हणतील', असे कॅप्शन देखील त्या फोटोला दिले आहे.
 

ashish nehra 
 
 
'ऋषी आणि आशिष नेहरा हे भाऊ होते जे कुंभमेळ्यात वेगळे झाले होते', "अभिनंदन आशिष नेहरा, तुझा प्रवास कसा होता...२००३च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध ६ विकेट्स घेण्यापासून ते २०२२ मध्ये इंग्लंडचे पंतप्रधान होण्यापर्यंत..." अशा अनेक कमेंटसह सध्या सोशल मीडिया भरलेला आपल्याला पाहायला मिळेल.
 
 

ashish nehra 
 
 
एवढंच काय तर आशिष नेहरा यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटोशॉप केलेला फोटो शेअर करत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, पीएम मोदी आणि पीएम ऋषी सुनक कोहिनूर परत आणण्याबाबत बोलत आहेत.
 
 

ashish nehra