नवी दिल्ली : १४ एप्रिल रोजी ट्विटर कंपनीची मालकी मिळवल्यानंतर आत एलॉन मस्कने ट्विटरच्या वापरकर्त्यांना झटका दिला आहे. कंपनी ताब्यात घेतल्यानंतर याबद्दल ट्विट करून मस्कने जाहीर केले आहे की भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतील, पण कॅज्युअल युझर्स साठी मात्र ट्विटर विनामूल्यच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मस्क यांच्या या ट्विटमुळे आता भविष्यात ट्विटरचे स्वरूप कसे असणार याबद्दल बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.
मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर ट्विटरच्या प्रशासनालाही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्याचे सीईओ पराग अगरवाल, पॉलिसी हेड विजया गडदे यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते असे सांगितले जात आहे. तरी अजूनतरी याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.