बंगलोर : कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटरला जबरदस्त धक्का दिला आहे. फेब्रुवारी २०२१ ते २०२२ दरम्यान केंद्र सरकारने ट्विटरला ३९ अकाउंट ब्लाक करण्याचे आदेश दिले होते. याचं आदेशाविरुध्द ट्विटरने त्यावेळी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज उच्च न्यायालयाने या याचिकेवर निकाल दिला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटरची याचिका फेटाळत. ट्विटरला ५० लाखाचा दंड ठोठावला आहे. सोबतच उच्च न्यायालयाने ट्विटरला ३९ युआरएल काढून टाकण्याचे आदेश दिलेत. उच्च न्यायालयाने आपल्या निकालात ट्विटरला चांगलेच खडे बोल सुनावले.
सोबतच न्यायालयाने ट्विटरला यापुढे सरकारचे आदेश नाकारण्यास मनाई केली आहे. गेल्यावर्षी ट्विटर आणि भारत सरकारमध्ये मतभेद निर्माण झाले होते. ट्विटरने भारतीय कायद्याचे पालण करण्यास नकार दिला होता. पण आता न्यायालयाचा हा निकाल ट्विटरसाठी मोठा झटका मानला जातं आहे.