वॉश्गिंटन : प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क elon musk यांनी ट्विटर ताब्यात घेण्याच्या घोषणेमुळे आता कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी उफाळून आल्याचे दिसून येते. कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांनी कंपनीचे भविष्य अंधारात असल्याची चिंता व्यक्त केली आहे. या कराराची चर्चा सुरू झाल्यापासूनच अग्रवाल आणि elon musk मस्क यांच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर अग्रवाल यांची नोकरीही धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, उघडपणे त्यांनी या गोष्टीचा विरोध केलेला नाही.
ट्विटर सीईओ यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना खासगीत या गोष्टी सांगितल्याची चर्चा आहे, elon musk मस्क यांनी हा करार केल्यानंतऱ आपल्या कंपनीचे भविष्य अंधारात असल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे. कंपनीच्या टाऊनहॉल येथील बैठकीत त्यांनी ही खंत बोलून दाखवली आहे. यानंतर मस्क elon musk यांची कर्मचाऱ्यांशीही एक प्रश्नोत्तराची सभा होणार आहे. मस्क ट्विटरबद्दल बऱ्याचशा नव्या गोष्टी सांगू इच्छीतात. कंपनीतून कर्मचारी कपात होण्याचीही भीती आहे, त्यावरही मस्क बोलणार आहेत. दरम्यान, तूर्त कुठलीही कपातीची शक्यता व्यक्त केलेली नाही.
एलन मस्क elon musk यांनी 'ट्विटर'ला ४४ दशलक्ष डॉलर्सला विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरचा वापर सर्वसामान्य युझर्ससह, राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रातल्या मान्यवरांतर्फे केला जातो. मस्क elon musk यांनी दिलेल्या या प्रस्तावानंतर ट्विटरच्या १६ वर्षांचा इतिहासातील हा एक सर्वात मोठा खरेदी करार ठरला आहे. मस्क यांनी प्रतिशेअर ५४.२ डॉलर इतकी बोली लावली आहे.
“भाषण स्वातंत्र्य हा कार्यरत लोकशाहीचा पाया आहे. ट्विटर हा डिजिटल टाऊन स्क्वेअर आहे, जिथे मानवतेच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली जाते. नव्या वैशिष्ट्यांसह उत्पादकता वाढेल, त्यासाठी नव्या अल्गोरीदमचा ओपन सोर्स बनवणार आहोत. त्यामुळे बनावट ट्विटर अकाऊंट्सला आळा बसेल. ट्विटरचा वापर पूर्वीपेक्षा अधिक चांगला करता येईल. मी आणि माझी टीम यासाठी कायम प्रयत्नशील राहू.” असे मस्क यांनी सांगितले.
मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याबद्दलचा त्यांचा खरा उद्देश्य हा अभिव्यक्तीला जीवंत ठेवणे आहे, असे म्हटले आहे. ट्विटरमध्ये आणखी बदल घडवणार आहोत. जर हा करार पूर्ण झाला तर फेक अकाऊंट्स विरोधात खुली मोहिम उघडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ट्विटर वापर करणाऱ्या प्रत्येकाची ओळख ही स्पष्ट असावी, असा मस्क elon musk यांचा उद्देश्य आहे. माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धीपत्रकातही याचा स्पष्ट उल्लेख आहे.