पंतप्रधान मोदी ठरले युट्युब वरील सर्वात लोकप्रिय राष्ट्रप्रमुख.

अमेरिकेच्या जो बायडेनसह सर्वच राष्ट्रप्रमुखांना टाकले मागे.

    01-Feb-2022
Total Views |
                                             
narendra modi
 
 
 
नवी दिल्ली: १ फेब्रुवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युट्युब खात्याने १० मिलियन म्हणजेच १ करोड सब्सक्राईबर्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले राष्ट्रप्रमुख ठरले आहेत. आता मोदी यांच्या नंतर ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो आहेत. त्यांचे ३६ लाख सब्सक्राईबर्स आहेत. सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या मोदींनी २६ ऑक्टोबर २००७ रोजी युट्युब जॉईन केले होते.
 
 
पंतप्रधान मोदी हे कायमच लोंकांशी संवाद साधण्यासाठी, विचार व्यक्त कारण्यासाठी, नवीन घोषणा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असतात. युट्युब व्यतिरिक्त मोदी हे ट्विटर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते आहेत. ट्विटर वर त्यांचे ७५.३ मिलियन इतके फॉलोअर्स आहेत आणि त्यांचा हा विक्रम जगातील कुठलाही नेता आजपर्यंत मोडू शकला नाहीये. मोदींचे फेसबुक वर ४६.८ मिलियन आणि  इंस्टाग्राम वर ६५. १ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
 
 
इतर नेत्यांच्या बाबतीत बोलायचे तर युट्युबवर मोदींनंतर ब्राझीलचे राष्ट्रपती बोल्सोनारो ३६ लाख, मेक्सिकोचे राष्ट्रपती अँड्रेस ओब्रेडोर ३०.७ लाख , व्हाईट हाऊसच्या अधिकृत खात्याचे १९ लाख तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे फक्त ७ लाख सब्सक्राईबर्स आहेत. मोदी हे भारतातही सर्वात जास्त सब्सक्राईबर्स असलेले राजकीय नेते आहेत. मोदींनंतर काँग्रेसचे राहुल गांधी यांचे ५.२४ लाख शशी थरूर यांचे ४.३९ लाख तर अससुद्दीन ओवेसी यांचे ३.७ लाख सब्सक्राईबर्स आहेत.