मुंबई : ट्विटरने दि.२१ एप्रिल रोजी एका नवीन नियमांची अंमलबजावणी करायला सुरूवात करायला सुरूवात केली होती . या नियमाअतंर्गत ट्विटर ब्ल्यू टीक आता फक्त त्यांच लोकांना मिळणार आहे. ज्यांनी ट्विटरकडे पैसे भरले असतील. त्यामुळे अनेक नेते, अभिनेते यासांरख्या अनेकांचे ब्ल्यू टीक गेले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी दि.२१ एप्रिल रोजी ट्विट केले की, “ए ट्विटर भैय्या ! तुम्ही ऐकत आहात का? आता आम्हीही पैसे भरले आहेत…म्हणून आमच्या नावासमोर जे निळे कमळ आहे, ते प्लीज परत लावा भाऊ, म्हणजे लोकांना कळेल की आम्ही अमिताभ बच्चन आहोत", असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले होते.
या ट्विटची दखल घेत. ट्विटरने अमिताभ बच्चन यांची ब्ल्यू टीक परत लावली आहे. यावर अमिताभ बच्चन म्हणाले की, ओ musk भैय्या! आम्ही तुमचे खूप आभारी आहोत! ओ, आमच्या नावासमोर कमळ लग गवा!आताच सांग भाऊ! गाना गाणे का मन कर राहा है भैय्या! पुढे ते म्हणाले , "तू चीज बडी है musk musk ...तू चीज बडी है, musk."
यानंतर अमिताभ यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले, अरे twitter मौसी ! गजब होए गवा !!उ, नील कमल ✔️ लगाए के बाद, नील कमलवा अकेले पड़ा-पड़ा, घबरात रहा ! तो हम सोचा , तनिक ओका company देई दें ।ते बग़ल में ओके, हम अपना झंडा 🇮🇳 गाड़ दिये !अरे , गाड़े में time लगा नाहीं, की कमलवा भाग गवा बताओ !अब ?का करी ?, असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.