१५ ऑगस्टला मांस मच्छी विक्री बंदीच्या निर्णया विरोधात राजकीय पक्ष आक्रमक; केडीएमसी आयुक्तांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा
11-Aug-2025
Total Views |
कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेने १५ ऑगस्ट रोजी शहरात मांस मच्छी विकण्यास बंदी घातली आहे. हा निर्णय केवळ एक दिवसाकरीता असला तरी त्याला अनेकांकडून विरोध होत असल्याने महापालिका प्रशासन या निर्णयामुळे अडचणीत आली आहे. हा निर्णय आयुक्तांनी तातडीने मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा राजकीय पक्षांकडून देण्यात आला आहे.
या निर्णयाचा कल्याणमधील हिंदू खाटीक समाजाने विरोध केला आहे. रिपाई आरपीआय गटाचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी या निर्णयाला विरोध करुन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा महापालिकेस दिला आहे. काही पक्षांकडून या निर्णयाला विरोध होत आहे.
कल्याणचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले की, एखादा निर्णय आयुक्तांनी घेतला असेल तर त्यामुळे सामान्य जनतेला फरक पडत नाही. सामान्य जनतेने विरोध केलेला नाही. मोजकीच लोक मांस मच्छी खातात. एका दिवसाच्या बंदीने काय फरक पडतो. स्वातंत्र्याच्या दिवशी जनावरांचा बळी जाऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे.