पाकिस्तानमध्ये हिंदू विद्यार्थ्यांवर धर्मांतरणाचा दबाव

    11-Aug-2025
Total Views |

मुंबई : पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मुलांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात आहे. त्याचबरोबर या मुलांना जीवनाच्या प्रत्येक स्तरावर भेदभाव आणि शोषणाला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तानच्या बाल हक्क राष्ट्रीय आयोगाच्या (एनसीआरसी) एका अहवालात ही माहीती देण्यात आली असून सरकारने तातडीने यात लक्ष देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, अल्पसंख्यांक मुलांना बालमजुरी, बालविवाह आणि जबरदस्तीने धर्मांतर यांसारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. हजारो हिंदू आणि ख्रिश्चन मुलांना रोज अशाप्रकारचे शोषण सहन करावे लागत आहे. हे कोणतेही कायदेशीर प्रकरण नाही; तर मानवाधिकारांवर संकट आहे.

एप्रिल २०२३ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत एनसीआरसी कडे अल्पसंख्याक मुलांच्या हत्या, अपहरण, जबरदस्ती धर्मांतरण आणि बालविवाहांच्या २७ अधिकृत तक्रारी आलेल्या आहेत. वास्तविक आकडेवारी यापेक्षा खूप अधिक भयावह असू शकते कारण अशा घटनांमध्ये अनेक कुटुंब भीतीमुळे शांत राहतात.

या प्रकरणावर एनसीआरसीच्या अध्यक्ष आयशा रजा फारूक यांचे म्हणणे आहे की या अहवालावरून अल्पसंख्यकांच्या कल्याणासाठी सरकार काही पाऊल उचलेल, अशी अपेक्षा ठेवणे हास्यास्पद आहे.