रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा २३ व २४ ऑगस्ट रोजी पनवेल येथे
11-Aug-2025
Total Views |
मुंबई : लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शनिवार, दि. २३ ऑगस्ट व रविवार, दि. २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत पनवेल येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हॉल, प्लॉट क्र. ४७५, मार्केट यार्ड येथे होणार आहे.
पुरुष व महिला खुल्या गटातील पहिल्या तीन क्रमांकांसह ओजोनगरिक पारितोषिक, उत्कृष्ट पखवाज वादक आणि उत्कृष्ट तबलावादक यांना रोख पारितोषिके व मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट असून, अधिक माहितीसाठी ९२२४३४४१३६, ७२०८७७६००५, ९८६७२९६८५० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीतून आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केले आहे.