अजित पवारांनी का हटवला पवारांसोबतचा फोटो?

    18-Apr-2023
Total Views | 61
 
Ajit pawar
 
 
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज सकाळपासून त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले फोटो डिलीट केले आहे. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचा फोटो होता. ते फोटो त्यांनी डिलिट केले आहे. त्यामध्ये वॉलपेपर अपलोड केल्यानंतर होणाऱ्या पोस्टसुद्धा डिलिट केल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी हा इशारा दिला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
  
अजित पवार भाजपा सोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु असताना अजित पवार यांचा शासकीय बंगला देवगिरी बंद असल्याचे वृत्त समोर आले आहे. शासकीय देवगिरी बंगल्यात, सकाळपासून अगदीच सामसूम आहे. आलेल्या अभ्यागतानाही ११ वाजता, विधिमंडळ कार्यालयात भेटतील हे सांगून रवाना केलं जातंय. कायम खुला असलेला, अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्याचा दरवाजा बंद असल्यानं राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121