
दरवर्षी विमान कंपन्या दूरवरच्या जागतिक शहरांना जोडण्यासाठी सीमा ओलांडताना दिसतात. सध्या ‘सिंगापूर एअरलाईन्स’द्वारे जगातील सर्वांत लांबवरचा विमानप्रवास हे त्याचेच उत्तम उदाहरण. प्रियजनांना भेटू इच्छिणार्या प्रवाशांसाठी आणि नवीन मार्ग शोधणार्या हौशी विमान प्रवाशांसाठी तर ही एक पर्वणीच. सर्वोत्तम विमान कंपन्यांपैकी एक असणारी ‘सिंगापूर एअरलाईन्स’ सिंगापूरपासून न्यूयॉर्कपर्यंत जगातील सर्वांधिक अंतरावरील ‘नॉनस्टॉप’ व्यावसायिक उड्डाण चालवते. हा प्रवास आहे असाधारण १८ तास आणि ४५ मिनिटांचा. असा हा ९ हजार, ५८५ मैलांचा प्रवास खरं तर प्रवाशांच्या सहनशक्तीचा आणि क्रू सदस्यांच्या अनुकूलतेची चाचणी घेणाराच म्हणावा लागेल.
उड्डाण तंत्रज्ञानात दिवसेंदिवस प्रगती होत आहे. जसे की, जास्त इंधन साठवण्याची, कमी इंधन जाळण्याची क्षमता, इकोनॉमी सीट्स अधिक आरामदायी बनवणे असे सुधारित प्रयत्न करत असताना, जगातील सर्वांत लांब उड्डाणे हळूहळू आणखी लांब होत आहेत. आता सर्वांत लांब उड्डाणे जगाच्या विरुद्ध बाजूंना असलेल्या शहरांना जोडतात आणि त्यासाठी तब्बल १७ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.
ऑस्ट्रेलियाची राष्ट्रीय विमान कंपनी ‘क्वांटास’ २०२६च्या मध्यात त्यांचे ‘प्रोजेट सनराईज’ सुरू करेल, ज्याअंतर्गत सिडनी आणि लंडन आणि न्यूयॉर्कदरम्यान अनुक्रमे १० हजार, ५७३ आणि ९ हजार, ९५० मैलांची नॉनस्टॉप सेवा समाविष्ट असेल. तेव्हा ती जगातील सर्वांत लांब उड्डाणे असतील. हे सर्वांत लांब उड्डाण (लंडन) २० तासांपर्यंत चालेल. या प्रकल्पाला ‘प्रोजेट सनराईज’ असे म्हटले जाईल. कारण, प्रवाशांना उड्डाणादरम्यान दोनदा सूर्योदय दिसेल. आजपर्यंत, जगातील सर्वांत लांब उड्डाण हे न्यूयॉर्क शहर आणि सिंगापूर दरम्यानचे १८ तासांचे उड्डाण आहे, जे ‘सिंगापूर एअरलाईन्स’द्वारे चालवले जाते. ‘एअरबस -३५०-९००णङठ’ हे विमान ९ हजार, ५८५ मैल प्रवास करते, ज्यामध्ये ६७ पॉड-शैलीतील बिझनेस-लास सीट्स आणि ९४ प्रीमियम इकोनॉमी सीट्स आहेत, यामध्ये नियमित इकोनॉमी सीट्स नाहीत. सिंगापूर ते नेवार्क ही जगातील दुसर्या क्रमांकांची सर्वांत लांब पल्ल्याची विमानसेवा फक्त १८ तास, ३० मिनिटांत पूर्ण होते. वर सूचिबद्ध केलेल्या न्यूयॉर्क ते सिंगापूर विमानसेवेपेक्षा थोडी कमी आहे. हे विमान ‘एअरबस-३५०-९००णङठ’ या त्याच विमानाद्वारे चालवले जाते. जगातील तिसर्या क्रमांकाची सर्वांत लांब म्हणजे, १८ तासांचा विमानप्रवास देणारी ‘एअर न्यूझीलंड’ ही फ्लाईट न्यूझीलंड आणि अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला नॉनस्टॉप मार्गाने जोडण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही सेवा ‘बोईंग ७८७-९ ड्रीमलाईनर’द्वारे चालवली जाते, ज्यामध्ये १८ बिझनेस-लास सीट्स, २१ प्रीमियम इकोनॉमी सीट्स आणि २६३ इकोनॉमी सीट्स आहेत.
मे २०२५ मध्ये ‘एअर न्यूझीलंड’ने मोठ्या ४के स्क्रीन, ब्लूटूथ ऑडिओ पेअरिंग आणि वैयक्तिक डिव्हाईसेस रिमोट म्हणून वापरण्याच्या पर्यायाने सुसज्ज असलेल्या नवीन रेट्रोफिटेड ड्रीमलाईनर्स उडवण्यास सुरुवात केली. २०२६ पासून एअरलाईनने त्यांचे नावीन्यपूर्ण स्कायनेस्ट स्लीपिंग पॉड्स, बंक-बेड-शैलीचे सेटअप आणि लांब पल्ल्याच्या फ्लाईट्सदरम्यान इकोनॉमी प्रवाशांना झोपण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी जागा मिळावी, यासाठी डिझाईन केलेले नवे विमान लॉन्च करण्याची योजना आखली आहे. क्वांटासदेखील त्यांच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात त्याच विमानाचा वापर करणार आहे. सध्या कोणतीही एअरलाईन नऊ हजार नॉटिकल मैलांपेक्षा जास्त लांबीची उड्डाणे चालवत नाही. पण, एक ऑस्ट्रेलियन एअरलाईन ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे महत्त्वाकांक्षी उपक्रम साकार करण्यासाठी आज जागतिक पातळीवर एअरलाईन कंपन्यांमध्ये स्पर्धाही वाढत आहे, हे नक्की. एकदा या विमानांनी उड्डाण केले की, त्या जगातील सर्वांत लांब उड्डाणे असतील. सिंगापूर एअरलाईन्सच्या ‘जेएफके’ मार्गापेक्षा एक हजार नॉटिकल मैलांनी पुढे जातील. परंतु, जोपर्यंत ते उड्डाण करत नाहीत, तोपर्यंत सिंगापूर एअरलाईन्स ही सर्वांत लांब उड्डाणांच्या यादीत पहिले स्थान कायम ठेवेल.