फक्त 'लोगो' बदलून मस्क थांबणार नाही, असा आहे पूर्ण प्लान!
24-Jul-2023
Total Views |
मुंबई : ट्विटरचे नवीन मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलले आहे. आजपासून ट्विटरचे नाव एक्स असेल. आता एक्स.कॉम उघडल्यावर, तुम्ही ट्विटरवर पोहोचाल. नावासोबतच ट्विटरचा लोगो ही बदलण्यात आला आहे. आता तुम्हाला पक्ष्याच्या जागी एक्स (X) दिसेल.
इलॉन मस्कच्या या निर्णयानंतर ट्विटर हा ब्रॅड संपल्यात जमा झाला आहे. आता या मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे नवे पर्व सुरू झाले आहे. आता ट्विटरच्या लोगो आणि नावासह एक नवीन यूआरएल (X.com) देखील आली आहे. मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर त्यात अनेक बदल केले आहेत.
काही दिवसांपुर्वीच इलॉन मस्क यांनी ट्विटरच्या वेरिफिकेशनसाठी पैसे आकारण्याला सुरुवात केली होती. आधी ही सुविधा मोफत होती. यासोबत इलॉन मस्क ट्विटरमध्ये आणखी बदल करु शकतात. मिडीया रिपोर्टनुसार इलॉन मस्क आपल्या सर्वच कंपन्यांना एक्स यूआरएलवर शिफ्ट करु शकतात. त्यामुळे इलॉन मस्क यांच्या कंपन्यांचे एकीकरण होईल.