मुंबई भाजपातर्फे दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १०६ मंडलांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Read More
Bangladeshi घुसखोरांना तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना त्रिपुरामध्ये मंगळवारी २५ मार्च २०२५ रोजी गोमाती जिल्ह्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाने सौम्या खातून, तस्लीम बिस्वास, सलिना बेगम, रीमॅन बेगम, अब्दुल रहीम शेख आणि अस्लम भुईया या एकूण सहा बांगलादेशी घुसखोरांना दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबई : ‘मुंबई लेबर युनियन’ (संलग्न : हिंदू मजदूर सभा)तर्फे ‘सिडको’ महामंडळातील ३०० कर्मचार्यांनी विविध मागण्यांकरिता ‘सिडको’ ( CIDCO ) भवनसमोर पुकारलेल्या धरणे आंदोलनाला आमदार मंदा म्हात्रे यांनी गुरुवार, दि. १६ जानेवारी रोजी उपस्थिती दर्शवली. कर्मचार्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या व सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डीले यांच्या दालनात तातडीची बैठक घेतली. या कर्मचार्यांचा मागण्या लवकर पूर्ण करण्यात याव्यात, असे आदेश आमदार म्हात्रे यांनी सहव्यवस्थापकीय संचालक कर्डीले व उपस्थित संबंधित अधिकार्यांना दिले.
( mumbai bank ) मजूर सहकारी संस्थांना मुंबई बँकेतून ५० लाखांपर्यंत कर्ज मिळणार - प्रविण दरेकर
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे योगदान महत्वाचे आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक नामवंत कलाकार, साहित्यिक, खेळाडू नावारुपाला आले असून याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, १ जुलै रोजी प्रभादेवी मुंबई येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई कामगार क्रीडा भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया व आचारसंहिता यामुळे नव्या कामगार कायद्यांशी संबंधित विषय काहीसा बाजूला पडणे स्वाभाविक होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाल्याने कामगार-व्यवस्थापन या उभय क्षेत्रांशी संबंधित अशा या विषयाला नव्याने चालना मिळणे अपेक्षित असून, त्यादृष्टीने उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात नव्या कामगार कायद्यांच्या पूर्वतयारीचा कानोसा घेणे समयसूचक ठरते.
विको लॅबोरेटरीज 'आयुर्वेदिक कॉस्मेटिक कंपनीचे प्रणेते व उद्योगपती यशवंत पेंढारकर यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. ते ८५ वर्षाचे होते. मुंबईजवळील डोंबिवलीत यशवंत पेंढारकर यांचे वडील केशव पेंढारकर यांनी १९५० च्या दशकात त्यांनी कंपनीची स्थापना केली होती. १९८५ मध्ये त्यांनी आपला व्यवसाय नागपूरमध्ये सुरू केला. यानंतर विको लॅबोरेटरीजचे विस्तारीकरण सुरू करण्यात आले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने निरीक्षण केले आहे की, राष्ट्रीय राजधानीसारख्या शहरात राहण्याचा खर्च पाहता इमारत आणि बांधकाम कामगारांना मासिक पेन्शन ३००० रुपये कमी आहे. जे दिल्ली इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत आहेत, त्यांना ६० वर्षे पूर्ण झाल्यावर ३००० रुपये इतकी मासिक पेन्शन देण्यात येते. “कोणत्याही खात्यानुसार, पेन्शनचा दर मासिक दर, जो रु. ३००० दिल्लीसारख्या शहरात राहण्याचा खर्च पाहता, कमी आहे,” न्यायमूर्ती राजीव शकधर आणि न्यायमूर्ती अमित बन्सल यांच्या खंडपीठाने सांगितले.
मुंबई वाहतूक पोलिसांची अधिसूचना जारी
अत्यावश्यक सेवेअंतर्गत मुंबई महापालिका रूग्णालयात, कोविड काळातही जोखिम पत्करुन केवळ १८ हजार रुपये वेतन घेऊन काम करणाऱ्या कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञ/सहाय्यक, ”क्ष” किरण तंत्रज्ञ/सहाय्यक, डायलिसिस तंत्रज्ञ/सहाय्यक, ब्लड बॅंक तंत्रज्ञ/सहाय्यक यांना पालिका सेवेत रिक्त पदी सामावून घ्यावे, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम व उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच ते पालिका आयुक्त व पालिका अतिरिक्त आयुक्तांना भेटणार आहेत.
कामगार विश्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा ¨कामगार केसरी° किताब धाराशिवच्या मुंतजीर सरनोबत याने पटकावला असून कुंभी कासारीचा नृसिंह पाटील हा ¨कुमार केसरी° किताबाचा मानकरी ठरला आहे. कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते विजेत्यांचा मानाची गदा, मानाचा पट्टा आणि रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
'महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी' अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. सदर भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याभरतीच्या माध्यमातून रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. सदर रिक्त पद हे कंत्राटी पध्दतीने भरले जाणार आहे.
वैद्यकीय शाखेचे महत्त्व जसजसे ठळकपणे समाजात अधोरेखित होत गेले, तसतसे त्यावर अवलंबून असलेल्या शाखांचेही महत्त्व पर्यायाने वाढत गेले. ज्यामध्ये औषधनिर्मिती करणार्या कंपन्या, पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी तसेच सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्स-रे इत्यादीची ‘डायग्नॉस्टीक सेंटर्स’ सुरू झाली.
आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर एकाकी पडलेल्या ठाण्यातील एका मराठी तरुणाची कंपनी बनावट दस्ताऐवज व स्वाक्षऱ्या करून हडपण्याचा दोघा व्यापाऱ्यांचा डाव फसला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर नौपाडा पोलिसांनी तब्बल २३ दिवसांनी व्यापाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
``ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे वीज ही अत्यावश्यक व मूलभूत गरज बनली आहे. या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताना मानव संसाधन व कामगार विभागाने सातत्याने कर्मचारी व कामगार संघटना यांच्यात सुसंवाद वाढविला पाहिजे``, असे मत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी व्यक्त केले.
पश्चिम बंगालमधील एका शाळेत स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. बंगालमधील उत्तर २४ परगना येथील बशीरहाट उपविभागातील टाकी नगरपालिकेतील टाकी षष्ठीचरण नीलमाधव हायस्कूलमध्ये दि. १ ऑगस्ट रोजी हा स्फोट झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार यांच्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्रीसुद्धा दाखल झाले आहे. दुपारी १२ वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या खात्यासंदर्भात चर्चा होणार आहे. यातचं अजित पवारांच्या गटाला मिळणाऱ्या मंत्रीपदाची संभाव्य यादीची माहिती मिळते आहे.
कामगार कायद्यांमध्ये काळाप्रमाणे बदल करणे गरजेचे असते. त्यावर सांगोपांग व व्यावहारिक मार्ग अवलंबवायला हवा. विशेषत: कामगार या शब्दाची सांगड केवळ व्यवस्थापकीय संदर्भातच नव्हे, तर मानवीय दृष्टिकोनातून घालायला हवी, अन्यथा कामाचे तास वाढवून उद्योगासह कामगारांचा पण लाभ होऊ शकणार नाही व तो केवळ एक द्रविडी प्राणायाम ठरू शकतो.
मंत्रीमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. शिवाय, शासनाने कंत्राटी ग्रामसेवकांच्या पगारात 10,000 हजार रुपयांची वाढ करत त्यांचे वेतन 16 हजार रुपये केले आहे. गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना 1500 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सुमारे 15.96 लाख हेक्टर बाधित क्षेत्रातील 27.36 लाख शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येईल.
ठाणे : नको ते भाषण ... अरे वचन देशील काय ; अरे कलेक्टर सायबा पलाट देशील काय ! असे वनवासी बोलीतील गाणे गात ठाणे जिल्ह्यातील वनवासी बांधवांनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी ठाणे जिल्ह्याधिकारी कार्यलयावर धडक मारली. वर्षानुवर्षे वनवासी आपल्या हक्काच्या जमिनी आपल्या नावांवर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र ते बाजूला राहिले उलट वनविभागाच्या वतीने राहती घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्याचा आरोप वनवासी बांधवांनी केला.मागण्या मान्य केल्या नाही तर, तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्रमजीवी संघटने
दि. 1 मे, 1923 या दिवशी एम. सिंगारवेलूंनी मद्रास (चेन्नई) शहरात दोन भव्य कार्यक्रम केले. या दोन्ही कार्यक्रमात त्यांनी 1 मे या कामगार दिनाचं महत्त्व सांगून, कामगारांची अस्मिता असणारा लाल बावटा फडकावला आणि आपण आज ‘लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्थान’ या पक्षाची स्थापना करीत आहोत, अशी घोषणा केली.
ज्या पद्धतीने पाठीत वार केला, त्याचा सूड तर घेणारच. कंत्राटदारांचे लाड करायचे आणि प्रसाद खायचे असं सरकार आहे. आपले दिवस परत येतील त्यानंतर जो प्रसाद आपण देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील. अशी टीका उबाठा गटाचे नेते उध्दव ठाकरे नाव न घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. यावेळी कामगारांची चळवळ एकजूट ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
भारताच्या ‘जीडीपी’ आणि रोजगाराचा महत्त्वपूर्ण भाग असलेले कृषी क्षेत्र उष्णतेच्या लाटेमुळे अत्यंत प्रभावित होते. अतिउष्णतेमुळे पिकांचे नुकसान घेऊन उत्पादनही कमी होते. शिवाय अन्नधान्याच्या किमतीही वधारतात. शेतकरी आणि ग्राहकांनाही या झळांची धग सहन करावी लागते. वाढत्या उष्णतेच्या लाटेचा पिकांवर होणार्या वाईट परिणांमाचा अभ्यास आणि उपाययोजना यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून तिच्या अहवालावर जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्याची गरज आहे. त्याविषयी...
खानिवडे : वसईत विभागवार चार दिवस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाजपा, शिवसेना, श्रमजीवी संघटना, आरपीआय महायुती आणि सावरकर यांच्या चाहत्यांकडून ही गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे . यात्रेची सुरवात विरार पूर्व येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात येणार आहे . ह्या यात्रेमध्ये चित्ररथाद्वारे सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंग दाखविण्यात येणार आहेत. याद्वारे त्यांचे राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी विचार समाजात पोहच
आर्थिक अस्थिरतेच्या वातावरणात जगभरात सर्वत्रच कामगार कपात होताना दिसून येते. याउलट भारत हा देश तरुणाईला काम देणारा देश, अशी नवी ओळख जगाच्या नकाशावर निर्माण करत आहे. हे नेमके कसे साध्य झाले, ते समजून घ्यायला हवे.
जगातील सर्व वन्य प्राणी आणि वनस्पतीनचे आपल्या जीवनातील योगदानाची जाणीव करून देण्यासाठी मार्च महिन्याच्या पहिली आठवड्यात जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. या विषयावर मुंबईतील विरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील जीवशास्त्रज्ञ डॉ. अभिषेक साटम यांच्याशी साधलेला संवाद.
आपल्या वैयक्तिक जीवनाप्रमाणेच उद्योग क्षेत्रात काम करणार्या अथवा या क्षेत्राशी संबंधित प्रत्येकासाठीच आपली व कामाच्या ठिकाणची सुरक्षितता सर्वोपरी महत्त्वाची असते. उद्योगातील सर्वांच्याच जिव्हाळ्याच्या व महत्त्वाच्या अशा ‘औद्योगिक सुरक्षितता’ या विषयाला विशेष चालना देण्यासाठी आपल्याकडे दरवर्षी दि. ४ ते ११ मार्च या कालावधीत ‘औद्योगिक सुरक्षा सप्ताह’ पाळला जाते. यामागे उद्योग क्षेत्रात सर्वांची सुरक्षा-सर्वोपरी सुरक्षा यावर भर देणार्या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा हा प्रासंगिक आढावा.
महाराष्ट्र भाजप प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांच्या जीवन सहचारिणी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वनवासी कल्याण आश्रमामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. कौटुंबिक जबाबदार्यांसह त्यांनी सदैव सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात दिला. त्यांच्या अशा या कार्यमग्न जीवनाचा परिचय करुन देणारा हा श्रद्धाजंलीपर लेख...
कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल अद्याप ठाम पुरावे कुणीही देऊ शकले नसले तरीही मूळ उगम हा चीनच असल्याचा दावा वारंवार करण्यात आला होता.
भारत सरकारने अमृतकालामध्ये परकीय विचारांची जोखड झुगारून आपल्या संस्कृतीनुसार, परंपरेने चालत आलेला, समाजासाठी त्याग व समर्पणाची प्रेरणा देणारा ‘विश्वकर्मा जयंती’ हा दिवस ‘राष्ट्रीय श्रमिक दिन’ म्हणून जाहीर करावा, असे आवाहन दि. 17 सप्टेंबर रोजी संपन्न झालेल्या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने ‘भारतीय मजदूर संघा’ने देशातील समस्त कामगार वर्गाच्यावतीने केंद्र सरकारला केले आहे. त्यामागील पार्श्वभूमी विशद करणारा हा लेख...
जगभरातील बहुतांश देशांनी शून्य कार्बन उत्सर्जनाचे ध्येय निश्चित केल्यामुळे भूगर्भातून मिळणार्या दुर्मीळ खनिजांची मागणी वाढली आहे. भूगर्भातील दुर्मीळ खनिजांपैकी १७ खनिजे ही स्मार्टफोन, इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण शस्त्रास्त्र यंत्रणा आणि इतर प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे एकेकाळी जी चढाओढ खनिज तेलाच्या प्राप्तीसाठी अथवा त्याचा साठा करण्यासाठी होती; तशीच चढाओढ आता दुर्मीळ खनिजांसाठी सुरू झाली आहे. त्यामध्ये केंद्रस्थानी आहे तो आफ्रिका खंड. आफ्रिका खंडात आता दुर्
समाज सुधारक, लोककवी, लेखक, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची दि. १ ऑगस्ट रोजी जयंती. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्यात तोपर्यंत उपेक्षित राहिलेल्या समाजातील व्यक्तींची कथा आलेली आहे. त्यांनी अनेक पोवाडेही लिहिले, तसेच त्यांचे साहित्य महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आणि येत्या काळात होणार्या कार्यक्रमांची माहिती देणारा हा लेख...
शहरी व महानगरीय क्षेत्रात मलनिस्सारणाचे काम करणार्या असंघटित, दुर्लक्षित कामगारांनाही मृत्यूचा सामना करावा लागतो. वेळोवेळी या आणि अशा प्रकारे मलनिस्सारण कामगारांच्या जीवघेण्या समस्येला अभ्यासपूर्ण पद्धतीने तोंड फोडण्याचे फार मोठे काम भारतीय मजदूर संघ व श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी न्यास, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच एक विशेष चर्चासत्राद्वारे करण्यात आले. त्यानिमित्ताने या विषयावरील चिंतन...
नव्या तरतुदींसह असणाऱ्या या कामगार कायद्यांच्या कक्षेत देशातील सुमारे ५० कोटी कामगारांचा समावेश अपेक्षित आहे. यामध्ये संघटित-असंघटित क्षेत्रातील कामगारांशिवाय स्वयंरोजगार करणाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विशेषतः ‘एमएसएमई` क्षेत्रात कार्यरत असंघटित व दुर्लक्षित कामगारांना आता कामगार कायद्यांच्या चौकटीत आणण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या वाडीबंदर येथे बुधवार दि. ६ रोजी कंत्राटी मजुरांच्या मुलांसाठी "मेरी पाठशाला" शाळेचे उद्घाटन करण्यात आले आहे. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनचं अध्यक्षा मीनू लाहोटी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ४० मुलांना वह्या, पेन आणि पेन्सिलचे वाटप करण्यात आले.
लेखक, संशोधक आणि स्तंभलेखक पुलिंद सामंत यांची विश्व हिंदू परिषद, कोकण प्रांतचे प्रचारप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे महाराष्ट्र प्रातांच्या १६ जिल्ह्यांमध्ये फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचे निमंत्रक आहेत श्रीरंग पिंपळीकर. त्यांच्याविषयी...
कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामगार मंत्रालयाने स्थलांतरित कामगारांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी किंवा नोकरीशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भारतभर एकवीस निरीक्षण केंद्रे सक्रिय केली आहेत.याशिवाय, केंद्राने सर्व राज्य आयुक्तांना तिसर्या लाटेदरम्यान स्थलांतरित कामगारांना आश्वस्त करण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून स्थलांतर रोखण्यासाठी स्थलांतरित कामगारांच्या नोंदी ठेवण्याची विनंती केली जाईल, असे कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
नव्या औद्योगिक कामगार कायद्यांचा ज्या बाबींवर परिणाम होणार आहे अथवा होऊ घातला आहे, त्यामध्ये औद्योगिक संबंध क्षेत्राशी निगडित व महत्त्वाच्या कामगार संघटना मान्यता व पद्धती, नोकरीचे स्वरूप आणि तपशील, बदल विषयक नियम, कामगार विवादविषयक पद्धती, संप व टाळेबंदी, नुकसान भरपाई व कल्याणविषयक धोरणे, कंत्राटी कामगार-अप्रत्यक्ष कामगार व विशेष अस्थायी कामगार इ. समावेश करण्यात आला आहे.
‘आंतरराष्ट्रीय श्रम संघटना’ आणि ‘युनिसेफ’ यांनी बालमजुरीवर नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. त्यानुसार कोरोना आपत्कालात ८.४ दशलक्ष बालके नव्याने मजुरीच्या क्षेत्रात ढकलली गेली आहेत. वय वर्षे पाच ते १७ वर्षांपर्यंतची मुलं धोकादायक क्षेत्रात काम करत आहेत.
तबलीगी जमात आणि कुंभमेळ्याची असलम यांच्याकडून तुलना ?
४७ वर्षांपासून तब्बल १५० देशांमध्ये मिडीया उत्पादन आणि रोग-निदान या क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणान्या हायमिडीया लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड उद्योग समूहाला जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (बायरेक-भारत सरकारचा उपक्रम) तर्फे उपचारात्मक लसी आणि औषध वितरण या श्रेणीमधील 'बी.आय.आर.ए.सी. इनोव्हेटर अवॉर्ड-२०२०'(BIRAC Innovator Award 2020) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
२०१२ ते २०१७ पर्यंत ५०० पेक्षा अधिक ‘हजारा’ बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येच दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आणि क्वेटा प्रत्यक्षात हजारांच्या ‘घेट्टो’मध्ये परिवर्तित झाल्याचे दिसते. इतके होऊनही ‘हजारा’ समुदायावरील हल्ल्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराची भूमिका कायम उपेक्षेचीच राहिली.
कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार कर्मचार्यांचे वाढलेले कामाचे तास आणि त्यानुसार होणारी वेतनवाढसुद्धा प्रस्तावित आहे. तुम्हीसुद्धा या निकषात बसता का हे जाणून घ्यायचंय? मग हा व्हीडीओ बघाच..
कामगार मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार कर्मचार्यांचे कामाचे तास आठऐवजी १२ पर्यंतच वाढणार नाही, तर त्यांच्या वेतनातही भरघोस वाढ होईल. कारण, कर्मचार्यांनी आठ तास काम केल्यास त्यांना ठरल्याप्रमाणे वेतन देण्यात येते, तर त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यास त्याची गणना ‘ओव्हरटाईम’ म्हणून केली जाईल व ‘ओव्हरटाईम’साठी दिला जाणारा मोबदला नेहमीच नियमित मोबदल्यापेक्षा दुप्पट असतो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ साली ‘इंडियन लेबर पार्टी’ची स्थापना केली. समाजातील सरंजामी, भांडवली व जातीयवादी मनोवृत्तीच्या विरुद्ध कामगारांना न्याय मिळवून देणे व कामगार वर्गामध्ये असलेला जातीवाद नष्ट करणे, असे ‘इंडियन लेबर पार्टी’चे मुख्य उद्दिष्ट होते, तसेच मुंबईमधील कापड गिरणीमध्ये काही खात्यामध्ये अस्पृश्य जातीच्या कामगारांना काम दिले जात नव्हते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सूचक वक्तव्य
आता ठेकेदारांशिवाय कंपनी थेट कामगाराशीच निश्चित कालावधीसाठी कॉन्ट्रॅक्ट करू शकेल व अशा कामगाराला नियमित कामगाराप्रमाणेच सर्व लाभ द्यावे लागतील, म्हणूनच ‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट’मुळे कामगारांना कधीही कामावरून काढून टाकता येईल, हा विरोधाचा मुद्दा तकलादू ठरतो. उलट आता सर्वप्रकारचे कामगार सर्वप्रकारचे लाभ मिळवू शकतील.
रशिया भारताला कोरोना लशीच्या १० कोटी डोसचा पुरवठा करणार आहे. डॉ. रेड्डीज कंपनी भारतात या लशीची चाचणी करणार आहे.
आज दि. १७ सप्टेंबर ‘विश्वकर्मा जयंती.’ हा कन्या संक्रातीचा दिवस. याच दिवशी भगवान विश्वकर्माचा जन्म झाला. हा दिवस हजारो वर्षांपासून आपल्या देशातील श्रमिक ‘विश्वकर्मा जयंती’ म्हणून साजरा करतात. विश्वकर्माला आपला पूर्वज मानतात. त्यानिमित्ताने...