वॉशिंग्टन : कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल अद्याप ठाम पुरावे कुणीही देऊ शकले नसले तरीही मूळ उगम हा चीनच असल्याचा दावा वारंवार करण्यात आला होता. कोरोना हा विषाणू चीनच्या वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीतून लीक झाल्याचाही दावा विविध तर्काअंती सांगण्यात आला होता. या दाव्याला दुजोरा देणारे पुरावे आता आढळू लागले आहेत. इथे कार्यरत एका संशोधकाने याबद्दल खुलासा केला आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था ‘द सन’ने केलेल्या रिपोर्टनुसार, चीन स्थित ‘वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी’मध्ये कार्यरत संशोधक एण्ड्रयू हफ यांनी हा खुलासा केला आहे. कोरोना हा मानवनिर्मितच आहे, जो चीनी प्रगोगशाळेतूनच WIV जगभर पसरवण्यात आला.
एण्ड्रयू हफ यांनी विषाणूचे संशोधन करणाऱ्या न्यूयॉर्कच्या एका एनजीओमध्ये काम केले आहे. ते म्हणाले की, "कोविड अडीच वर्षांपूर्वी कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेतूनच पसरला आहे. वुहान इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीतूनच हा प्रसारित झाला आहे. ९-११ नंतर अमेरिकन गुप्तचर यंत्रणांचं हे सर्वात मोठं अपयश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे आणि यासाठी सरकारी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारीच जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या उत्पत्ती वादाची सुरुवात नेहमीच वुहानच्या प्रयोगशाळेच्या भोवतीच होते. मात्र, चीन या सर्व गोष्टींना विरोध करत आला आहे.
कोरोना महामारीबद्दल हफ यांनी आपले नवे पुस्तक ‘द ट्रुथ अबाउट वुहान’ यात बरेचसे खुलासे केले आहेत. कोरोना आटोक्यात न येण्यासाठी अमेरिकन सरकारला जबाबदार धरले आहे. आपल्या पुस्तकात ते म्हणतात की, "प्रयोगशाळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या बायो-सेफ्टीशी निगडीत यंत्रणांचा वापर करण्यात कसूर झाली होती. विषाणूचा विस्फोट झालाच तर त्यापासून बचाव कसा करायचा याबद्दलही खबरदारी घेण्यात आली नव्हती. याच कारणास्तव विषाणूचा प्रसार झाला.