महाराष्ट्रदिनी दादर परिसरात वाहतुकीत मोठे बदल

पहाटे ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूकबदल

    29-Apr-2024
Total Views | 30

maharashtra din


मुंबई, दि.२९ : प्रतिनिधी 
महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे २०२४ रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या संचालनच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार दादरसह परिसरात वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, १ मे २०२४ रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त परेड आयोजित केली जात आहे. परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालीलप्रमाणे आदेश दिले जात आहेत.

संचलन मार्ग

संचलन शिवाजी पार्क मैदानापासून सुरु होऊन गेट नं. ५ मधून बाहेर पडुन केळूस्कर मार्ग उत्तर ते सी. रामचंद्र चौक-स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, दक्षिण वाहिनी ते संगीतकार वसंत देसाई चौक (केळूस्कर रोड दक्षिण जंक्शन) ते उजवे वळण घेवून नारळी बाग येथे समाप्त होईल. यामुळे सर्व वाहन चालकांनी सकाळी ६ ते १२ च्या दरम्यान वर या रस्त्यांवरून प्रवास करणे टाळावे जेणेकरून प्रवासादरम्यान गैरसोय कमी होईल. तसेच याबाबत ठिकाणी बोर्ड/चिन्हाने दर्शविण्यात आले असून, प्रत्येक जंक्शन/सिग्नलवर वाहतुक पोलीसांचीही नेमणुक करण्यात आलेली आहे. विना कारपास घेणाऱ्या स्थानिक व इतर नागरीकांकरीता सुचना १ मे रोजी परेड संचलनाचे वेळी विना कारपास येणाऱ्या स्थानिक व इतर नागरिकांनी आपली वाहने मुंबई महानगपालिका यांनी सुरु केलेल्या कोहिनुर सार्वजनिक वाहन तळ, जे. के. सावंत मार्ग, दादर (प.) येथे पार्क करण्याची विनंती करण्यात आली आहे.

वाहतुकीस प्रवेश बंद

एन. सी. केळकर मार्ग व एल. जे. रोड जंक्शन पासुन (गडकरी जंक्शनपासून) केळूस्कर मार्ग, दक्षिण व उत्तर जंक्शनपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शन पर्चत वाहतूकीस बंद राहील.

एक दिशा मार्ग

केळूस्कर मार्ग दक्षिण, पूर्वेकडील वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील म्हणजेच या मार्गावर स्वातंत्रवीर सावरकर मार्गावरून येणाऱ्या वाहनांना प्रवेश मिळेल. मीनाताई ठाकरे पुतळा येथून उजवे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर हा पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहतुकीस एक दिशा मार्ग राहील. एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शन पर्यंत एक दिशा मार्ग राहील.सिध्दीविनायक जंक्शन येथून स्वातंत्रवीर सावकर मार्गे पश्चिम उपनगराकडे जावू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी सिध्दीविनायक जंक्शन येथे उजवे वळण घेवून, एस. के. बोले रोडने पोर्तुगिज चर्च जंक्शन येथे डावे वळण घेवून गोखले रोड मार्गे गडकरी जंक्शन, एल. जे. रोड, राजा बडे चौक येथून पश्चिम उपनगराकडे प्रस्थान करतील. येस बँक जंक्शन चेथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शन पर्यंत प्रवेश बंद केल्याने, दक्षिण मुंबईकडे जावू इच्छिणारे वाहन चालक हे त्यांची वाहने एस. व्ही. एस. रोडने येस बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क रोड नं. ५ म्हणजे पांडूरंग नाईक मार्गे राजा बडे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गडकरी जंक्शन मार्गे गोखले रोड मार्गाने दक्षिण मुंबईकडे प्रस्थान करतील.

नो पार्किंग झोन

१.केळूस्कर मार्ग दक्षिण व उत्तर.
२.कर्नल दिलीप गुप्ते मार्गावर केळूस्कर मार्ग उत्तर पासून पांडूरंग नाईक मार्गापर्यंत
३.पांडूरंग नाईक मार्ग, रोड नं. ५.
४.एन. सी. केळकर मार्ग, गडकरी जंक्शन पासून कोतवाल गार्डन पर्यंत.

शासकीय विभागाच्या वाहनांकरीता पार्किंग व्यवस्था.

१. स्वातंत्रवीर सावरकर स्मारक
२. वनिता समाज सभागृह.
३. महात्मा गांधी जलतरण तलाव
४.कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ

आमंत्रितांसाठी

१. दक्षिण व मध्य मुंबईतुन टिळक उड्डाणपूलमार्गे शिवाजी पार्क येथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी मार्ग
२.दक्षिण मुंबईतुन डॉ. अॅनी बेझंट रोड मार्गे शिवाजी पार्क थेथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी
३.पश्चिम उपनगरातुन माहिम ओल्ड कॅडल रोडने शिवाजी पार्क येथे थेणाऱ्या आमंत्रितांसाठी
४.पश्चिम उपनगरातुन येणाऱ्या आमंत्रितांनी माहिम जंक्शन ओल्ड कॅडल रोड हिंदुजा
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121