विरार, वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार येथील जिल्हा परिषद प्राथमिक रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले होते.
ह्या शिबिराला नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक आवर्जून उपस्थित होते. यावेळी आ. नाईक यांनी वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना व अंगणवाडी सेविकांना वृक्ष वाटप करून विद्यार्थ्यांना व नागरिकांना वृक्ष लागवड करण्यास प्रोत्साहित केले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नारायणजी मांजरेकर, विरार पूर्व उत्तर मंडळ अध्यक्ष वैभव झगडे, विरार पूर्व मंडळाचे अध्यक्ष महामंत्री मिलिंद वैद्य, महेश पटेल, महेश कदम, सुनीताजी पाटील, सागर विचारे, दुर्गेश पाटील, आशू पाटील, अक्षय म्हस्के, हरीकेश कनोजिया, निलेश घरत, किरण किनी, राजू राव, आदित्य माने, वंश जाधव, प्रदीप मोरे, ज्योती मोरे, राजीव मांजरेकर, विनोदकुमार गुप्ता, अजय सहानी, सुलतान इद्रीशी, नईम ईद्रीशी, आम्रपाली खैरनार, भाग्यश्री पाध्ये, रंजना इंगळे, उषा खरे, अरुणा खरे, सौ. सुवर्णा जगताप इ. कार्यकर्ते उपस्थित होते. ह्या शिबिराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे प्रा. डी.एन. खरे यांनी सांगितले. तसेच यावेळी प्रा. आ. केंद्र चंदनसार येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जाधव यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले.