वसईत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

    03-Apr-2023
Total Views | 72
sawakargaurav yatra

खानिवडे
: वसईत विभागवार चार दिवस स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून भाजपा, शिवसेना, श्रमजीवी संघटना, आरपीआय महायुती आणि सावरकर यांच्या चाहत्यांकडून ही गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे . यात्रेची सुरवात विरार पूर्व येथील वीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन आणि पुष्पहार अर्पण करून प्रारंभ करण्यात येणार आहे . ह्या यात्रेमध्ये चित्ररथाद्वारे सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध प्रसंग दाखविण्यात येणार आहेत. याद्वारे त्यांचे राष्ट्रवादी व हिंदुत्ववादी विचार समाजात पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
यात्रेचे स्वरूप

बुधवारी 5 एप्रिल रोजी वसई पूर्वेच्या खानिवडे येथून दुपारी 2 वाजल्या पासून श्री राममंदिर ते शिरसाडनाका पेल्हार, सोपरफाटा , वाकनपाडा , नवजीवन वसाहत , वसई फाटा वळण घेऊन वालीव , रेंजऑफिस वालीव पोलीस ठाणे, शर्मावाडी (UP) नाका , संतोषभुवन पेट्रोलपपं , गौराईपाडा नाका, बिलालपाडा , श्रीराम नगर ते धानिव बाग तर, गुरुवार दिनांक 6 एप्रिल 2023 दुपारी 3:00 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, विरार, पूर्व उड्डाणपुला खालून सुरवात होऊन नालासोपारा पूर्व मार्गे गाला नगर, आचोळे पोलिस ठाणे मार्गे, पंचवटी -अंबाडी नाका -बाभोला -मार्गे हुतात्मा चौक पापडी वसई येथे स्मारकास अभिवादन करून यात्रेचा समरोप . तर शुक्रवार 7 एप्रिल व शनिवार 8 एप्रिल रोजी नालासोपारा आणि वसई विधानसभा विभागात यात्रा आयोजित केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121