पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा संपन्न

- भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद : - मंत्री गणेश नाईक

    17-May-2025
Total Views |
 
Tricolor Yatra in the presence Minister Ganesh Naik
 
पालघर: ( Tricolor Yatra in the presence Minister Ganesh Naik ) पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर शौर्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले हे भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.
 
सामर्थ्यवान भारतीय सैन्याचे कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालघर येथील हुतात्मा चौक ते बस स्थानकादरम्यान करण्यात आले.
 
तिरंगा रॅलीमध्ये खासदार डॉ. हेमंत सवरा , आमदार हरिश्चंद्र भोये, भरत राजपूत , आदी मान्यवरासह नागरिक उपस्थित होते.
पाकिस्तानने केलेल्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व भारतीयांना विश्वास होता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य या हल्ल्याला चौक प्रत्युत्तर देणार त्याचप्रमाणे भारतीय सैन्याच्या तिन्ही सैन्य दलाने संयुक्तरीत्या कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे तसेच हवाई पट्टी उध्वस्त केली.
 
पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्की ,चीन यांची अस्त्रे देखील भारतीय सैन्याने निष्काम करून टाकले भारतीय सेना किती सजग आणि सामर्थ्यवान आहे. हे सर्व जगाने पाहिले आणि आज संपूर्ण जग सामर्थ्यवान भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.