डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार कायद्यातील योगदान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2020
Total Views |

Dr ambedkar1_1  
 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १५ ऑगस्ट १९३६ साली ‘इंडियन लेबर पार्टी’ची स्थापना केली. समाजातील सरंजामी, भांडवली व जातीयवादी मनोवृत्तीच्या विरुद्ध कामगारांना न्याय मिळवून देणे व कामगार वर्गामध्ये असलेला जातीवाद नष्ट करणे, असे ‘इंडियन लेबर पार्टी’चे मुख्य उद्दिष्ट होते, तसेच मुंबईमधील कापड गिरणीमध्ये काही खात्यामध्ये अस्पृश्य जातीच्या कामगारांना काम दिले जात नव्हते.
 
 
त्यांना केवळ कमी दर्जाची कामे दिली जात व एकाच कारखान्यामधील कामगारांमध्ये आपापसात कामाच्या ठिकाणी अत्यंत टोकाचे जातीभेद पाळण्यात येत असत. या सर्वांच्या विरुद्ध ‘इंडियन लेबर पार्टी’ने लढा देण्याचे ठरविले. शासन पुरस्कृत उद्योगांना प्रामुख्याने चालना देणे, कामगारांच्या भल्याकरिता व त्यांच्या सुरक्षेकरिता सक्षम कामगार कायद्यांची मागणी करणे, कामगारांना किमान वेतन मिळणे, कामाचे तास नियमित करणे, भर-पगारी रजा, घरकूल योजना, जहागीरदारी पद्धतीचे निर्मूलन करणे, कामगारांच्या कामाचे कसब वाढविण्याकरिता सरकारने त्यांना तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देणे, जेणेकरून कुशल कामगार तयार होतील, कारखान्यामधील चांगल्या पगाराच्या व फायद्याच्या नोकरीमधून दलित समाजाला वगळले जाऊ नये, म्हणून आवाज उठविणे, ही या संघटनेची प्रमुख उद्दिष्ट होती. जातीयवादामुळे केवळ श्रमाची विभागणी न होता, कामगारांचीही विभागणी झालेली होती.
 
 
त्याविरुद्ध ‘इंडियन लेबर पार्टी’ने लढा दिला. ‘इंडियन लेबर पार्टी’ने राजकीय निवडणूक याच विचारधारेच्या आधारे लढविली व १९३७ च्या निवडणुकीत (Provincial Election) १७ जागांवर लढा देऊन १४ जागा जिंकून आणल्या. ब्रिटिश परिषदेत (Executive Council) १९४२ ते १९४३ या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लेबर मेंबर (मंत्री) म्हणून काम करत होते. या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कामगार कायदे व कामगारांच्या हिताच्या बाबीवर काम केले असून, त्यांचे फायदे कामगारांना मिळवून दिलेले आहेत. 
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नामुळे दलित नव्हे, तर सर्व समाजातील कामगारवर्गास मिळालेले अधिकार व फायदे यातील काही महत्त्वाच्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत.
 
१) कोणताही लिंग-भेद न करता प्रत्येक स्त्री-पुरुषास समान कामास समान वेतन मिळावे. २) पूर्वी १२ ते १४ तास कामगारांचे काम चालत असे, त्याऐवजी प्रत्येक दिवशी केवळ आठ तासांची शिफ्ट व जादा काम केल्यास अतिरिक्त कामाचा दुप्पट मोबदला मिळणे. ३) एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना. ४) भारतीय श्रमिक संघ अधिनियमाची सुधारणा करून कामगार संघटनांना अनेक अधिकार दिले. ५) कामगार विमा योजना. ६) कामगार कल्याण योजना (लेबर वेल्फेअर). ७) भविष्य निर्वाह निधी कायदा. ८)किमान वेतन कायदा (Minimum Wages act). ९)महिला कामगारांना बाळंतपणाची रजा. (मॅटरनिटी बेनिफिट अ‍ॅक्ट). १०)कामगारांना/कर्मचार्‍यांना भरपगारी रजा महागाई भत्ता (D.A.). ११)कामगारांना कायदेशीर संपाची सभा. १२) कोल अ‍ॅण्ड मेकामाईन्स प्रोव्हिडण्ड फंड अ‍ॅक्ट. १३) Collection of statistics under Industrial Statistics Act. १४) त्रिपक्षीय समितीकडून औद्योगिक विवाद समेंट घडवून आणण्याकरिताची कार्यवाही कशी असावी, समेट कार्यवाही याबाबत औद्योगिक संबंध अधिनियम तरतूद. १५)टेक्निकल ट्रेनिंग स्कीमद्वारे कुशल कामगारांना प्रशिक्षण. १६)कामगारांना घरे उपलब्ध करून देण्याकरिता लेबर कॅम्प योजना. १७)कामगारांच्या नुकसानभरपाई नियमात सुधारणा. १८) औद्योगिक स्थायी आदेश सुधारणा. (Industrial Standing Order) अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात केलेल्या अनेक लोकोपयोगी कार्यामध्ये कामगारांकरिता अनेक विशेष अधिकार व कायद्यातील तरतुदींमधून, सुरक्षा व सोईसुविधा, उपरोक्त कायद्यामधून मिळवून दिलेल्या आहेत.
 
भारतामधील कामगारांना व कर्मचार्‍यांना किमान वेतन, महागाई भत्ता, भर पगारी रजा, बोनस, आठ तास कामाचा दिवस, मध्यान्ह जेवणाची सुट्टी, अतिरिक्त कामासाठी दुप्पट दराने वेतन, आठवड्याची सुट्टी, असे अनेक दैनंदिन जीवनाशी निगडित अधिकार विशेष कष्ट न घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर या द्रष्ट्या कामगारनेत्याने मिळवून दिलेले आहेत. अशा या कामगारनेत्यास तमाम कष्टकरी जनतेच्या वतीने कोटी कोटी प्रणाम...
 
 
- शिरीन लोखंडे
@@AUTHORINFO_V1@@