ज्या पद्धतीने पाठीत वार केला, त्याचा सूड तर घेणारच!

    27-Apr-2023
Total Views |
 

Uddhav thackeray
 
 
मुंबई : ज्या पद्धतीने पाठीत वार केला, त्याचा सूड तर घेणारच. कंत्राटदारांचे लाड करायचे आणि प्रसाद खायचे असं सरकार आहे. आपले दिवस परत येतील त्यानंतर जो प्रसाद आपण देऊ तो आयुष्यभर लक्षात राहील. अशी टीका उबाठा गटाचे नेते उध्दव ठाकरे नाव न घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे. यावेळी कामगारांची चळवळ एकजूट ठेवा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
 
ठाकरे म्हणाले, "कामगार दिन, महाराष्ट्र दिन जवळ आलाय. जय जवान, जय किसान आणि जय कामगार ही घोषणा बाळासाहेबांनी दिली होती. AC मध्ये बसून कॅबिनेट मिटिंग घेणाऱ्यांना कामगारांचे मोल कळत नाही. कामगारांच्या हिसक्याने काय होणार? सरकार संवेदनशील असायला हवे. १९९५ साली युतीचे सरकार होते तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं होतं मोर्चे येतील ते अडवायचे नाही. ज्या खात्याविरोधात मोर्चा येईल त्या खात्याच्या मंत्र्याने मंत्रालयातून खाली उतरून मोर्चाला सामोरे जायचे. पण आता असं होत नाही. वापरा आणि फेंका ही कंत्राटी कामगारांची अवस्था आहे."
 
"महाराष्ट्राचं काम 'गार' करणारे राज्यात सरकार आहे. आपले सरकार असताना जवळपास २५ पेक्षा जास्त उद्योग महाराष्ट्रात आणले. अडीच लाख कोटी गुंतवणूक आणली. पण या सरकारच्या काळात त्यातील अनेक उद्योग पळवले. भूमिपुत्रांच्या न्यायहक्कासाठी शिवसेना जन्माला आली. आज जे बाळासाहेबांचे विचार सांभाळतो बोलणारे मूग गिळून गप्प बसले आहेत. महाराष्ट्राचे होणार काय?" असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.