गोखले इन्स्टिट्यूटमार्फत एस. एल. किर्लोस्कर फाउंडेशनच्या आर्थिक मदतीने ‘ओशन’ या प्रकल्पाअंतर्गत कोकण किनारपट्टीवर वापरलेल्या इंजिन तेलाचे संकलन करण्यात येत आहे. (Ocean Oil Collection)
Read More
बेळगाव येथील वाडमय चर्चा मंडळातर्फे दिला जाणारा कविवर्य कृ. ब. निकुंब साहित्य पुरस्कार (काव्यसंग्रह) २०२३ या वर्षासाठी कवी, लेखक गीतेश गजानन शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
मच्छीमारांनी बोटींमध्ये वापरल्यानंतर उरलेले इंजिन ऑईल खरेदी करून त्याद्वारे रोजगार देऊन सागरी प्रदूषणावर रोख बसविण्याचा प्रयत्न ‘ओशन ऑईल कलेक्शन एन्व्हॉर्यमेंटल अॅक्शन नेटवर्क’(ओशन) या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणात होत आहे. चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना देणार्या या प्रकल्पाविषयी...
अजय देवगण आणि रितेश देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला गुन्हेगारी थरारपट ‘रेड २’ बॉक्स ऑफिसवर चांगलीच गती पकडून आहे. प्रदर्शनाच्या ११व्या दिवशी या चित्रपटाने कमाईत उंच झेप घेतली. Sacnilk च्या अहवालानुसार, दुसऱ्या रविवारी ‘रेड २’ ने ११.७५ कोटी रुपयांची कमाई केली, जी शुक्रवार आणि शनिवारी झालेल्या कमाईपेक्षा जास्त आहे.
आपल्या जीवनात भूतकाळातील आठवणींचे अवशेष मनाला सुखावणारे असतात. परंतु, या सुखाच्या पलीकडे जाऊन खर्या अर्थाने आपण जेव्हा त्या त्या काळाचे अन्वयार्थ लावतो, तेव्हा समृद्ध असे विचारसंचित जन्माला येते. याच गोष्टीची प्रचिती म्हणजे नरेंद्र पाठक यांचा ललित लेखसंग्रह ‘वानोळा.’
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ६ हजार १९८ कोटी ०५ लाख रुपये इतके विक्रमी मालमत्ता कर संकलित करण्यात आले आहे. यात अतिरिक्त दंडाच्या स्वरुपात १७८ कोटी ३९ लाख रुपयेसुद्धा संकलित करण्यात आले आहेत.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जूनची प्रमुख भूमिका असणारा 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. अनेक चित्रपटांच्या कमाईचे त्याने रेकॉर्ड मोॉले असून प्रदर्शनानांतरच्या पहिल्या सोमवारी कलेक्शनच्या परीक्षेत पुष्पा २ पास झाला आहे की फेल हे जाणून घ्यायला हवं. ५ डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट देशभरात तेलुगु भाषेसह हिंदी, तमिळ,कन्नडा, मल्याळम आणि बंगालीत प्रदर्शित झाला. पुष्पा २ या चित्रपटाने जगभरात पाच दिवसांत ९०० कोटींचा गल्ला जमवला आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरहिट चित्रपट पुष्पा २ चित्रपटाने सध्या प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. अल्लू अर्जुनची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'पुष्पा २' ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनापुर्वीच रेकॉर्ड मोडला होता. आणि आता ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाल्यानंतर 'पुष्पा २' बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसांमध्येच ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित बहुचर्चित स्त्री २ हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापुर्वी देखील तिकीट बूकिंगच्या बाबतीत इतिहास रचला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. ‘स्त्री’ २०१८ मध्ये रिलीज झाला होता, त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ‘स्त्री २’ प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे.
देशाच्या थेट प्रत्यक्ष करात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १ एप्रिल ते जून १७ कालावधीत वाढ होत तिजोरी तुडुंब भरली आहे. वित्त मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, सरकारच्या कर संग्रहण (Tax Collection) मध्ये २१ टक्क्यांनी वाढ होत कर ४६२६६४ कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच काळात कर संकलन ३.८२ लाख कोटींवर होते जे आता वाढत ४.६३ लाख कोटींवर पोहोचले आहे. मुख्यतः वैयक्तिक कर आकारणीत मोठी वाढ झाल्याने कर संग्रहणात मी वाढ झाली आहे.
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी शनिवार, दि. ८ जून रोजी सखोल स्वच्छता मोहीम (डीप क्लीन ड्राईव्ह) राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात ८५ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज), २५ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू आणि ६५ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ३१६ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.
जीएसटी (GST)संग्रहणात (Collection) मध्ये इयर ऑन इयर (YoY) बेसिसवर वाढ झाली आहे. मे महिन्यात जीएसटी संग्रहणात १० टक्क्यांनी वाढल्याचे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे. मे महिन्यात जीएसटी (Goods and Services Tax) मध्ये १.७३ लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे मागील महिना एप्रिलमध्ये २.१० लाख कोटी संग्रहणाचा नवा विक्रम नोंदवला होता.आपल्या निवे दनात वित्त मंत्रालयाने म्हटले आहे की, 'मे महिन्यात जीएसटी कलेक्शन १.७३ लाख कोटीवर पोहोचले आहे.'
मालमत्ता करभरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात मुंबई महानगरपालिकेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे.
मुंबईत प्रत्येक वर्षी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ठेवले जात असले तरी प्रत्यक्षात त्याची वसुली होती नाही तसेच मोठ्या मालमत्ता कर थकबाकीदारांकडूनही वसुली होत नाही. या पार्श्वभूमीवर आता महापालिका आयुक्तांनी कर निर्धारण व संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देत मुंबईतील प्रत्येक मालमत्तांची तपासणी करून त्या जागेचा प्रत्यक्षातील वापर आणि त्यांचे क्षेत्रफळ यांची माहिती घेऊन नव्याने मालमत्ता कराची देयके तयार केली जावीत, असे सांगितले.
मुंबई: आता कर चुकव्यांचे वाईट दिवस सुरू होणार आहेत का असे विचारण्यास हरकत नाही कारणही तसेच आहे जीएसटी केंद्रीय व राज्याच्या अधिकारी वर्गाने एकत्र येत नवीन बैठक बोलावली आहे. या नवीन बैठकीत कर चुकवण्यासाठी हातखंडे वापरणाऱ्या कंपन्यांना तसेच बनावट कंपनीच्या नोंदणी करणाऱ्या कंपन्यांना आळा घालण्यासाठी उपाय आणण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
जीएसटी प्रणाली २०१७ मध्ये लागू केल्यानंतर प्रथमच जीएसटी संकलनात रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. प्रथमच सरकारने संग्रहणात केलेल्या जीएसटीत २.१० लाख कोटींपर्यंत वाढ झाली आहे. ही वाढ एप्रिल महिन्यातील असून मार्चमध्ये जीएसटी (Goods and Sales Tax) १.७८ लाख कोटी होता. इयर ऑन इयर बेसिसवर जीएसटीत १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.घरगुती व्यवहारात झालेली वाढ आणि आयातीत केलेले व्यवहार यामुळे मुख्यतः ही वाढ झाली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा मालमत्ताकर कर संकलनाचे उद्दिष्ट एकूण ४ हजार ५०० कोटी रुपये आहे. तर कर भरणा करण्याचा अंतिम दिनांक २५ मे आहे. यापैकी दिनांक २३ एप्रिलपर्यंत सुमारे ३ हजार ५६९ कोटी रूपयांच्या मालमत्ताकराचे संकलन झाले आहे. निर्धारित लक्ष्य ४ हजार ५०० कोटी रूपयांच्या तुलनेत हे प्रमाण ७९ टक्के इतके आहे. देय दिनांकांच्या उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत जनजागृती, थकबाकीदारांकडे पाठपुरावा करून १०० टक्के कर संकलन करण्याचा ठाम निर्धार महानगरपालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे
भारताच्या थेट कर संकलनात (Direct Tax Collection) १७.७ टक्क्याने वाढ झाली आहे. तज्ञांनी अपेक्षित केल्यापेक्षाही कर संकलनात वाढ झालेली आहे. वैयक्तिक आयकर संग्रहणात ५०.०६ टक्क्यांहून ५३.३ टक्क्यांवर ही वाढ झाल्याने थेट कर संकलनात ही वाढ झाली आहे. मात्र कॉर्पोरेट कर संकलनात ४९.६ टक्क्यांवरून घट होत ही ४६.५ टक्क्यांने संकलन झाले आहे.
जीएसटी कलेक्शनसंबंधी मोठी बातमी प्रसारमाध्यमांनी दिली आहे मार्चमध्ये जीएसटी (Good and Sales Tax) मधील कलेक्शनमध्ये ११.५ टक्क्याने वाढ होत जीएसटीचे संकलन (Collection) १.७८ लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. दरम्यान, या चित्रपटाने प्रदर्शनापासून आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याची आकडेवारी समोर आली आहे.
रणदीप हुड्डा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सकारात्मक कमाई केली आहे. शिवाय प्रेक्षकांनी देखील या (Swatantryaveer Savarkar) चरित्रपटाला उलचून धरले आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील आवर्जून प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहावा म्हणून आग्रह केले आहेत.
दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या प्रेक्षकांना भलतीच भूरळ घातली आहे. २०२४ मधील प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस आलेला चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman). अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) याची प्रमुख भूमिका असलेला हा 'हनुमान' (Hanuman) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शिवाय जिओ आणि झी५ या ओटीटी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनही तिथेही या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहेत. आता आणखी एका ओटीटी वाहिनीवर हनुमान चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
देशाच्या डायरेक्ट (प्रत्यक्ष) कर संग्रहणात (कलेक्शनमध्ये)१९.८८ टक्क्याने वाढ झाली असल्याचे आयकर विभागाने (Income Tax Department) ने सांगितले आहे. देशाच्या एकूण कर संग्रहण (कलेक्शन) मध्ये १९.८८ टक्क्याने वाढत १८.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सरकारने अंदाजापैकी यंदा ९७ टक्के कर संग्रहण लक्ष पूर्ण केले आहे.
अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांनी पहिल्यांदाच एकत्रित काम केलेल्या 'शैतान' (Shaitaan) चित्रपटाला चांगलेच यश मिळृताना दिसत आहे. ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केली आहे. इतकेच नव्हे तर, या (Shaitaan) चित्रपटाची प्रदर्शनापुर्वी देखील अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १.७६ लाखांहून अधिक तिकिटे विकून ४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज जीएसटी अंमलबजावणी अधिकारी वर्गाची कॉन्फरेन्स (परिषद) घेणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जीएसटी (गुड्स अँड सर्विसेस टॅक्स) अंमलबजावणी अधिकाऱ्यांची बैठक निर्मला सीतारामन या घेणार असल्याचे म्हटले आहे. टॅक्सचोरी रोखण्यासाठी, जीएसटी कराची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी व तसेच 'इज ऑफ डुईंग बिझनेस ' धोरणासाठी किचकटपणा घालवून करप्रणाली चे सुलभीकरण करण्यासाठी ही परिषद अर्थमंत्र्यांकडून घेण्यात येणार आहे.
फेब्रुवारी २०२४ मध्ये सरकारच्या सकल जीएसटी टॅक्स संग्रहात (कलेक्शन )वाढले आहे. सकल गुड्स सर्विसेस टॅक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. जीएसटी कलेक्शन १६८३३७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचून इयर ऑन इयर बेसिसवर (वर्षांनुवर्षे) आधारित १२.५ टक्क्याने जीएसटीत वाढ झाली आहे. अधिकृत माहितीनुसार,आयात केलेल्या उत्पादने व वाढलेला घरगुती व्यवहारांच्या आधारावर हे कलेक्शन वाढले आहे.
आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल ३७० ( Article 370) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे वास्तव या चित्रपटात तंतोतंत दाखवण्यात आले आहे. जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० चा स्वातंत्र्यापासूनचा ७५ वर्षांचा इतिहास अतिशय उत्कृष्टपणे मोठ्या पडद्यावर मांडण्यात संपुर्ण टीमला यश आले आहे. नुकतीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली याचे आकडे समोर आले आहेत. आनंदाची बाब म्हणजे ६ दिवसांत या चित्रपटा
अलीकडील काळात सर्पमित्रांनी सापांविषयीची सर्वसामान्यांची भीती दूर करून त्याबाबत कुतूहल निर्माण केले. याबाबत अशाच एका संशोधक वृत्ती असलेल्या देवदत्त शेळके या मास्तरविषयी...
शास्त्रीय पद्धतीने मधसंकलन व विक्री करत ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून नाशिक जिल्ह्यात नावलौकिक मिळवणार्या वनवासी पाड्यावरील विलास दरोडे यांची ही यशोगाथा...
जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी आर्टिकल ३७० या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
लुईस फिलिप या आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्या भारतातील प्रिमिअम मेन्सवेअर ब्रॅण्ड रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्शन लाँच होत आहे. ही विशेष श्रेणी प्रत्येक नवरदेवाला त्याच्या जीवनातील खास दिवशी राजेशाहीचा अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत, जी कालातीत अभिजातपणा आणि समकालीन आकर्षकतेचे प्रतीक आहे.
जळगावचे यशस्वी उद्योजक केशव लक्ष्मण क्षत्रिय. प्रामाणिक कष्ट आणि समाजशीलता जपत केशव यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. त्यांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...
हिंदी चित्रपटांचा यंदाचे वर्ष कमाईच्या बाबतीत फारच आनंदित गेले असे म्हणण्यास हरकत नाही. २०२३ या वर्षाची सुरुवात शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाने दमदार केली. बॉक्स ऑफिसवर १००० कोटींच्या घरात या चित्रपटाने कमाई केली. त्यानंतर वर्षाच्या मध्यांतरात ‘जवान’ चित्रपटाने बाजी मारली. परंतु, वर्षाचा शेवट जरी शाहरुखच्याच ‘डंकी’ने झाली असली तर या चित्रपटाने मात्र बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली आहे. २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला डंकी चित्रपट पहिल्याच दिवशी ‘अॅनिमल’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मागे टाकू शकला नाही.
निर्धार पक्का केला, तर मराठी माणूसही व्यवसायामध्ये उत्तुंग यश, नावलौकिक मिळवू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भवरी कलेक्शनचे सर्वेसर्वा रमेश लक्ष्मण भिलोरे. लहानपणापासून कष्टाची कामे केली. मात्र, सगळीकडून मदतीचे मार्ग बंद झाल्यानंतर त्यांनी जमीन विकण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याच निर्णयातून आज ५० हून अधिक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. जाणून घेऊया त्यांची खडतर, परंतु तितकीच प्रेरणादायी अशी यशोगाथा......
शिवाजी महाराजांनी बांधलेल्या नौका या चार फूट खोलीतून ही प्रवास करू शकतात. आणि आज आपल्याला अश्या प्रकारच्या आरमारी नौका बांधण्याची आवश्यकता आहे, याला क्रांती म्हणतात असे प्रतिपादन मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक प्रा. पांडुरंग बलकवडे यांनी केले.
गुड्स व सर्विस टॅक्स ( GST) तून मिळणारा महसूल वाढून ऑक्टोबरमध्ये १ लाख करोड झाला आहे. इयर ऑन इयर बेसिसवर १३ टक्यांनी कलेक्शनमध्ये वाढ झाल्याचे सरकारी अहवालात म्हटले गेले आहे.
सिंगल स्क्रीन व खासकरून बॉलिवूडच्या व्यवसाय मंदीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.कोरोना काळापासूनच चित्रपट विश्वाला मोठा आर्थिक फटका बसला होता.परंतु आता अचानक चित्र बदलले आहे.आर्थिक वर्ष २०२३ च्या तिमाहीतच मागील वर्षीच्या एकूण आर्थिक उत्पन्नाच्या सुमारे ७५ टक्के गल्ला जमवला आहे.यशस्वी चित्रपटांबरोबर अनेक चित्रपटांनी तुलनात्मक दृष्ट्या चांगला नफा कमावला आहे.'मिंट' ने याविषयी अहवाल प्रसिद्ध केला आहे.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांतातर्फे नुकतीच गिरगांवची वारसा सफर आयोजित करण्यात आली होती. अधूनमधून पण जोरदारपणे कोसळणार्या पावसाच्या सरींची मजा लुटत सहभागींनी सफरीचा आनंद घेतला. त्याचाच शब्दबद्ध केलेला हा अनुभव...
डाव्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या त्रिपुरात २०१८ मध्ये सत्तांतर झाले आणि भाजप सत्तेवर आले. भाजपने मात्र पाच वर्षांत या राज्याचा कायापालट केला. म्हणूनच २०१६-१७ मध्ये केवळ ४.६१ कोटी रुपये करसंकलन होणार्या त्रिपुरात २०२२-२३ मध्ये तेच करसंकलन तब्बल ९८२.५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अशी ही त्रिपुराची विकासगाथा थक्क करणारी आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यांतील रस्त्यांची जबाबदारी नव्या महामंडळावर देण्यात येणार आहे. परिणामी खड्डेमुक्त रस्त्यांचं मिशन पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
नाशिक : सन २०२२-२३ मध्ये नागरी प्रशासनाच्या विविध कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नाशिक महानगरपालिकेला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्ग महानगरपालिका या गटातून नाशिक महानगरपालिकेस प्रथम क्रमांकाने नगर विकास दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत (बोरिवली भाग) आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित वनविहार उद्यान, एक्सर, बोरिवली येथे सुरु झालेल्या ’इतिहास कट्ट्या’वर ’साष्टीच्या गोष्टी’ या पहिल्या पर्वाला इतिहासप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुंबई महानगरीत हरवलेल्या साष्टीच्या इतिहासाचे विवेचन जाणकार अभ्यासकांकडून जनमानसापर्यंत यानिमित्ताने पोहोचते आहे. पर्वाच्या चौथ्या गोष्टीत वेध घेतला जाणार आहे. या भूमीवर ३०० हून अधिक वर्ष राज्य करणार्या राजघराण्याचं - शिलाहारांचं! एकेकाळी संपूर्ण कोकणाला राजकीय स्थैर
Pathan movie review 'पठाण' पाहण्याचा काल दुर्दैवी योग आला. चित्रपट पाहिल्यावर आम्ही तिघेही अगदी भिन्न विचारसरणी असणाऱ्या मित्रांची प्रतिक्रिया एकच होती- "ये क्या था भाई ,मतलब कुछ भी....." "पठाण तगडा चित्रपट आहे", "बॉलिवूडला तारणारा आहे ,जबरदस्त मास चित्रपट आहे", अशा अनेक थोर लोकांच्या पोस्टी इथं वाचल्या होत्या.
घरोघरी तिरंगा अभियानाला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, तिरंग्याचे नंतर करायचे काय हा प्रश्न कुणालाही पडू नये म्हणून
जून २०२२ मध्ये, एकूण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर महसूल १,४४,६१६ कोटी रूपये संकलित झाला आहे
आजोबांकडून मूर्ती संग्रहाचा वारसा मिळालेल्या आणि आपल्या संस्कृतीची, परंपरांची ओळख डोळसपणे करून देणार्या नाशिक येथील सागर काबरे यांच्याविषयी...
फेब्रुवारी महिन्यात ‘जीएसटी’ अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण १ लाख, ३३ हजार, ०२६ कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. यामध्ये ‘सीजीएसटी’ अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २४ हजार, ४३५ कोटी रुपये, ‘एसजीएसटी’ अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ३० हजार, ७७९ कोटी रुपये, ‘आयजीएसटी’ ६७ हजार, ४७१ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले ३३ हजार, ८३७ कोटी रुपये धरून) आणि अधिभार १० हजार, ३४० कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले ६३८ कोटी रुपये धरून) यांचा समावेश आहे
"मावळतीचे रंग" ह्या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा दादर येथील मकरंद सहनिवासाच्या सभागृहात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला या पुस्तकाचे लेखन संजय गोखले यांनी केले.