बॉलिवूडच्या चित्रपटांची सप्टेंबर तिमाहीत 'चांदी'

आर्थिक वर्ष २३ च्या तिमाहीत मागील वर्षीच्या ७५ टक्के उत्पन्न वसूल

    21-Sep-2023
Total Views | 23
Bollywood
 
बॉलिवूडच्या चित्रपटांची सप्टेंबर तिमाहीत 'चांदी'
 
आर्थिक वर्ष २३ च्या तिमाहीत मागील वर्षीच्या ७५ टक्के उत्पन्न वसूल
 

मुंबई:सिंगल स्क्रीन व खासकरून बॉलिवूडच्या व्यवसाय मंदीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.कोरोना काळापासूनच चित्रपट विश्वाला मोठा आर्थिक फटका बसला होता.परंतु आता अचानक चित्र बदलले आहे.आर्थिक वर्ष २०२३ च्या तिमाहीतच मागील वर्षीच्या एकूण आर्थिक उत्पन्नाच्या सुमारे ७५ टक्के गल्ला जमवला आहे.यशस्वी चित्रपटांबरोबर अनेक चित्रपटांनी तुलनात्मक दृष्ट्या चांगला नफा कमावला आहे.'मिंट' ने याविषयी अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
अहवालानुसार चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगले कमबॅक करून सप्टेंबर अखेरीस तब्बल १३०० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या रिपोर्टनुसार २२ च्या एकूण ७५ टक्के उत्पन्न या तिमाहीत जमवले गेले.
 
गदर २, जवान अशा मोठ्या चित्रपटांने तुफान गंगाजळी कमावली असल्याने चित्रपट वर्तृळ,चित्रपट निर्माते यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.या दोन मोठ्या चित्रपटाप्रमाणे ओएमजी २,रॉकी और रानी की प्रेम कहानी अशा चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला असल्याचे या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे.
 
जवान चित्रपटाला घवघवीत यश मिळत असून ९०० कोटींहून अधिक महसूल मिळवला असून शाहरुख खानचाच ' पठाण' हा चित्रपटही १०५० कोटींहून अधिक कमाई केलेला चित्रपट ठरला आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121