नवी दिल्ली : जून २०२२ मध्ये, एकूण जीएसटी अर्थात वस्तु आणि सेवा कर महसूल १,४४,६१६ कोटी रूपये संकलित झाला असून यापैकी केंद्रीय वस्तु आणि सेवा कर म्हणजे सीजीएसटीचा वाटा २५,३०६ कोटी रूपये, राज्यांचा जीएसटी म्हणजे एसजीएसटी ३२,४०६कोटी रूपये तर एकीकृत म्हणजे आयजीएसटीचा वाटा ७५,८८७ कोटी (वस्तुंच्या आयातीवरील ४०,१०२ कोटी रूपयांसह) आणि अधिभार ११,०१८ कोटी रूपये (वस्तुंच्या आयातीवरील ११९७ कोटी रूपयांसह) आहे.
जून २०२२ मध्ये, जीएसटीचे एकूण संकलन हे एप्रिल २०२२ मध्ये झालेल्या संकलनानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन असून एप्रिलमध्ये १,६७,५४० कोटी रूपये संकलन झाले होते. सरकारने आय़जीएसटीच्या रकमेपैकी केंद्रीय जीएसटीसाठी २९,५८८कोटी रूपये तर राज्यांच्या जीएसटीसाठी २४,२३५ कोटी रूपये असे प्रमाण ठरवले आहे. याशिवाय, या महिन्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारने तात्पुरत्या आधारावर, आयजीएसटी रकमेपैकी २७,००० कोटी रूपये संकलन हे प्रत्येकी ५०:५० गुणोत्तराप्रमाणे निश्चित केले आहे. जून २०२२ मध्ये, नियमित आणि तात्पुरत्या आधारावर जुळवाजुळव झाल्यावर, केंद्र सरकार आणि राज्यांसाठी एकूण जीएसटी संकलन केंद्रीय जीएसटी म्हणजे सीजीएसटीसाठी ६८,३९४ कोटी रूपये तर राज्यांचा जीएसीसाठी ७०,१४१ कोटी रूपये इतके आहे. जून २०२२चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा ५६ टक्क्यांनी अधिक आहे, जे ९२,८०० कोटी रूपये होते. मागील वर्षी याच महिन्यातील उत्पन्नापेक्षा, वस्तुंच्या आयातीपासूनचे उत्पन्न ५५ टक्क्यांनी अधिक आणि देशांतर्गत व्यवहारांपासून (सेवांच्या आयातीसह) या स्त्रोतांपासून उत्पन्नापेक्षा ५६ टक्के अधिक आहे.
जीएसटी सुरू झाल्यापासून मासिक संकलनाने पाचव्यांदा आणि मार्च २०२२ पासून सलग चौथ्या महिन्यात १.४० लाख कोटी रूपयांपेक्षा अधिकचा आकडा पार केला आहे. मे २०२२ मध्ये ७.३ कोटी एकूण ई वे बिल्स निर्माण करण्यात आले जे एप्रिल २०२२ मधील ७.४ कोटी पेक्षा २ टक्क्यांनी कमी आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत सरासरी मासिक जीएसटी संकलन १.५१ लाख कोटी रूपये राहिले असून गेल्या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १.१० लाख कोटी रूपये झाले होते. यात ३७ टक्के वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शवते. जीएसटी लागू झाल्यापासून या महिन्यात संकलित एकूण अधिभार हा आतापर्यंत सर्वोच्च आहे.