पहलगाम हल्ल्यापूर्वी पाक कर्मचाऱ्याच्या संपर्कात - ज्योती मल्होत्राची कबुली

    21-May-2025
Total Views | 19
पहलगाम हल्ल्यापूर्वी पाक कर्मचाऱ्याच्या संपर्कात - ज्योती मल्होत्राची कबुली

नवी दिल्ली, नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगातील एका कर्मचाऱ्याच्या नियमित संपर्कात असल्याची कबुली युट्यूबर ज्योती मल्होत्राने दिली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली आहे.

हिसार पोलिसांचे प्रवक्ते विकास कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मल्होत्राने चौकशीदरम्यान कबूल केले की ती नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत पाकिस्तानी नागरिक आणि उच्चायोगातील अधिकारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांच्या संपर्कात होती.

 अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की दानिश मल्होत्राला गुप्तचर म्हणून विकसित करण्यासाठी सक्रियपणे काम करत होता. तिचे तीन मोबाईल फोन आणि लॅपटॉप, हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (एचएसजीएमसी) आयटी प्रभारी हरकिरत सिंग यांचे दोन फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि गुप्तचर विभाग (आयबी) च्या अधिकाऱ्यांनी ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी (पीआयओ) असलेल्या संशयास्पद संबंधांबद्दल सखोल चौकशी केली. तिचे संबंध आणि संवाद आता व्यापक तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.

तपासयंत्रणा मल्होत्राच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या इतिहासाची देखील तपासणी करत आहेत. नोंदींवरून असे दिसून येते की तिने २०१८ मध्ये तिचा पासपोर्ट मिळवला होता, जो २०२८ पर्यंत वैध होता आणि तिने पाकिस्तान, चीन, दुबई, थायलंड, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि इंडोनेशियासह अनेक देशांमध्ये प्रवास केला आहे.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121