गुटखा थुंकण्यासाठी कारचा दरवाजा उघडला अन् काही मिनिटांत होत्याचं नव्हतं झालं!

    04-Jun-2025
Total Views | 97
 
car door opened to spit the gutkha
 
रायपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर येथे एका कार चालकाला त्याच्या निष्काळजीपणामुळे भीषण अपघाताला सामोरे जावे लागले आहे. यात त्या कारमधील व्यावसायिकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवार, दि. २ जून रोजी बिलासपूर येथे हा अपघात घडला.
 
१०० किमी पेक्षाही जास्त वेगात असलेल्या या कारच्या कार चालकाने गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला. यातच कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा गंभीर अपघात घडला. या अपघातग्रस्त गाडीत ३१ वर्षीय कापड व्यापारी जॅकी गेही होते. कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाच्या चुकीमुळे ही कार वेगात रस्त्यावर उलटली आणि इतर दोन वाहनांना जाऊन धडकली. धडक दिलेल्या कारचा चालकही या अपघातात जखमी झाला आहे.
 
ड्रायव्हरने गुटखा थुंकण्यासाठी दरवाजा उघडला
 
तपासानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व्यावसायिक असलेला जॅकी गेही रविवारी रात्री एका पार्टीला गेले होते. त्याने रात्री १.३० वाजता आपल्याला घेण्यासाठी मित्र आकाश चांदणीला बोलावले. आकाश पंकज छाब्रासोबत जॅकीला नेण्यासाठी आला. जॅकी यांना घेतल्यानंतर आकाश गाडी चालवत होता आणि पंकज कारच्या पुढच्या सीटवर बसला होता तर जॅकी मागे होता. त्यांची गाडी बिलासपूर-रायपूर महामार्गावरून जात असताना आकाशने गुटखा थुंकण्यासाठी वेगात असणाऱ्या गाडीचा अचानक दरवाजा उघडला आणि हा अपघात घडला.
 
जॅकीचा जागीच मृत्यू
 
कार चालक आकाशने गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे गाडी डिव्हायडरवर जाऊन आदळली आणि गाडीने पलटी मारली. हा अपघात इतका जोरदार होता की, तिघेही जण गाडीतून खाली फेकले गेले. जॅकी गंभीरपणे फेकले गेल्याने त्यांच्या छाती, डोके आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
 
कार इतर वाहनांनाही धडकली
 
चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेलेली कार बाजूला पार्क केलेल्या वाहनाला धडकली. या धडकेत आणखी चार ते पाच वेळा पलटली आणि शेवटी पार्क केलेल्या एका कारला जाऊन धडकली. त्यात कारचा चालक जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी तत्काळ परिसर सील करत जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121