'बिग बजेट'चा 'बी ग्रेड' चित्रपट - पठाण

Pathan movie review

    27-Jan-2023
Total Views | 501

Pathan




Pathan movie review :  'पठाण' पाहण्याचा काल दुर्दैवी योग आला. चित्रपट पाहिल्यावर आम्ही तिघेही अगदी भिन्न विचारसरणी असणाऱ्या मित्रांची प्रतिक्रिया एकच होती- "ये क्या था भाई ,मतलब कुछ भी....." "पठाण तगडा चित्रपट आहे", "बॉलिवूडला तारणारा आहे ,जबरदस्त मास चित्रपट आहे", अशा अनेक थोर लोकांच्या पोस्टी इथं वाचल्या होत्या.


250 कोटी खर्चून हिरो, हिरोईन अगदी व्हिलनलाही उघडं नागडं दाखवून मन समाधान झालं नाही, तर लोकांना परदेशवारी करायला सगळ्या देशातल्या लोकेशनही फिरवून झाल्या. हॉलिवूडसारखा डिट्टो चित्रपट आम्ही बनवून दाखवू, अशा जिद्दीनंतर सिद्धार्थ आनंद भाऊंनी हा चित्रपट बनवला असावा. त्यात सुपर एजंट युनिव्हर्स पुढे बघायला मिळणार आणि त्यात टायगर ऊर्फ सलमानही असणार अशी हिंटही दिली.


27 January, 2023 | 12:35

 
 
शाहरूखचे फॅन्स अगदी कितीही पांचट सीनला मोकार ओरडताना दिसत होते. थोडक्यात सांगायचा तर 'पठाण' हा बिग बजेटचा बी ग्रेड पिच्चर वाटतो. संपूर्ण चित्रपटात दोनच गाणी आहेत. दुसरं चित्रपटाच्या एंड क्रेडिट्सच्या वेळी.दिग्दर्शकालाही ते गाणं याच लायकीचं वाटावं यातच सर्व आलं. साऊथवाल्यांना इतकं बजेट पुरवलं तर ते याचं सोनं करतील ही गोष्ट बॉलिवूडप्रेमींनाही ठाऊक आहे.


त्यामुळे पन्नाशीपारचा नायक आपल्याच म्हाताऱ्या मित्रासोबत पेन किलर खात रेल्वेवरून पळताना दाखवणं. त्याचं फिट्ट शरीर पण चेहरा गळालेला दाखवणं, वारंवार शरीरप्रदर्शनातून हिरो या वयातही किती फिट्ट आहे हे फोर्सफुली दाखवणं, महिला पात्राचा अगदी चवीपुरता वापर, चित्रपटात वारंवार 'रक्तबीज' शब्द वापरून डोक्याचा भुगा करणं हे पांचट प्रकार चित्रपटात प्रामुख्याने दिसतात.



27 January, 2023 | 12:36


चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्सही फार प्रभावी ,कलात्मक वाटत नाही किंबहुना घुसडल्यासारखीच वाटत राहतात.अगदी संपूर्ण चित्रपटच 'फोर्सफुली' विशेषणाला सार्थ ठरतो.सेकंड हाफमध्ये तर चित्रपट झोप आणतो.मानवी तर्कबुद्धीला अनपेक्षित, अशक्य वाटणारे सर्व कारनामे चित्रपटात जगाला वाचवण्याचा ठेका घेतलेल्या महान अवतारांपैकी एक अवलिया 'पठाण' करतो. कारण काय तर देशभक्ती! ही चित्रपटात पोत्यात धान्य भरवून हलवावं तशी भरली आहे दाबू दाबून.



27 January, 2023 | 12:37
बोल्ड, सेक्सी, हॉट या शब्दांच्या व्याख्याच दिग्दर्शकाला कळत नाही का?, अशी शंका येते. चित्रपटाची कथा एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर किंवा हॉलिवूडच्या कोणत्याही एजंट, सिक्रेट मिशन, देशभक्ती असल्या तद्दन गल्लाभरू चित्रपटात असणाऱ्या साचेबद्ध कथांपेक्षा अजिबात वेगळी नाही. भारत-पाकिस्तान हा आपल्या लोकांना भावनिक करणारा मसालाही इथं दिसतो.

कोरोना ,कलम 370 अशा गोष्टींचा संदर्भ येणं इतकंच काय ते नवं बाकी सब पुरानाच.त्यामुळे नेमकं काय बघावं हा प्रश्न पडतो.शिवाय अॅक्शन हिरो टाईप भूमिका सलमानला जास्त सूट होतात ,तो त्या उत्तमपणे निभावू शकतो हे त्याच्या कॅमिओ सीन्समध्ये आपल्याला जाणवतं.बाकी दिपिका पदुकोण ,जॉन अब्राहमने त्यांच्या भूमिका आपापल्या पद्धतीनं बऱ्यापैकी केल्यात.विशाल शेखरनं इतर भाषेतील एखादं गाणं ढापून त्यात हिंदी लिरिक्स जोडून म्हणण्याचा पराक्रम परत एकदा छान केलाय.

अख्खा पिच्चरच हॉलिवूडपटाची कॉपी वाटण्याजोगा आहे मग संगीत पण कॉपी सॉरी प्रेरणा घेतलेलं असलं तर काय बिघडलं.....बाकी मी एक साधारण प्रेक्षक असून माझं हे वैयक्तिक मत आहे.वाचकांनी चित्रपट आपल्या रिस्कवर आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या तिकिटावर बघावा.

 - ऋषिकेश तेलंगे


(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121