मुंबई : "मावळतीचे रंग" ह्या कथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा दादर येथील मकरंद सहनिवासाच्या सभागृहात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या पुस्तकाचे लेखक संजय गोखले आहेत. पुस्तकाची प्रस्तावना डॉ. गिरीश दाबके यांची आहे. यावेळी ज्ञानेश पेंढारकर, मॄदुला भाटकर, विनय येडेकर यांच्यासह अन्य जेष्ठ मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिनेते विजय गोखले यांनी केले. आभार प्रदर्शन शुभदा दादरकर यांनी केले. या कार्यक्रमास वाचन प्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभला. दिपक करंजीकर यांच्या भाषणाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.