कर संकलनात रेकॉर्डब्रेक वाढ - आयकर संग्रहणात ५३.३ व कॉर्पोरेट कर संकलनात ४६.५ टक्के वाढ

कॉर्पोरेट कर संकलनापेक्षा वैयक्तिक कर संकलनात अधिक वाढ

    22-Apr-2024
Total Views |

Tax
 
 
मुंबई: भारताच्या थेट कर संकलनात (Direct Tax Collection) १७.७ टक्क्याने वाढ झाली आहे. तज्ञांनी अपेक्षित केल्यापेक्षाही कर संकलनात वाढ झालेली आहे. वैयक्तिक आयकर संग्रहणात ५०.०६ टक्क्यांहून ५३.३ टक्क्यांवर ही वाढ झाल्याने थेट कर संकलनात ही वाढ झाली आहे. मात्र कॉर्पोरेट कर संकलनात ४९.६ टक्क्यांवरून घट होत ही ४६.५ टक्क्यांने संकलन झाले आहे.
 
केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये १९.५८ अब्ज रुपये कर गोळा केला आहे. पुनर्रचनेतील कर परतावा पकडत प्रत्यक्ष कर संकलनात १७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Board of Direct Taxes CBDT) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मार्च अखेरपर्यंत कर संकलनात १८.२३ अब्ज रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज केंद्राने व्यक्त केला होता. मात्र १ मार्च रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात हा अंदाज १९.४५ अब्जावर जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात थेट कर संकलनात १९.५७ लाख कोटींपर्यंत वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १६.६४ लाख कोटी रुपयांचे प्रत्यक्ष कर संकलन झाले होते.
 
अर्थव्यवस्थेतील वेगामुळे प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाली आहे. सांख्यिकी विभागाने मांडलेल्या अंदाजाने किरकोळ मुदतीत अर्थव्यवस्थेने ९.१ टक्के दराने वाढ केली आहे.वैयक्तिक कर संग्रहात १०.४४ अब्ज रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सीबीडीटीच्या आकडेवारीनुसार वैयक्तिक कर संकलनात वार्षिक २५.२३ टक्यांने वाढ झाली आहे.आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सरकारने १०.५ टक्क्यांने किरकोळ मुदतीत वाढ होऊ शकते असे म्हटले होते.
 
स्थूल (ग्रॉस) कर संकलनात वाढ होत कर संकलन २३.२७ टक्क्यांवर पोहोचले आहे. ज्यामध्ये कॉर्पोरेट करात १३ टक्क्यांनी व वैयक्तिक कर संकलनात २४.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.पहिल्यांदा स्थूल कर संकलनात २०.१८ लाख कोटीवर पोहोचले असल्याचे सांगितले आहे.मागील वर्षाच्या तुलनेत स्थूल कर संकलनात ११.७ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अर्थमंत्रालयाने सांगितले आहे.