मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज जीएसटी अंमलबजावणी अधिकारी वर्गाची कॉन्फरेन्स (परिषद) घेणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या जीएसटी (गुड्स अँड सर्विसेस टॅक्स) अंमलबजावणी अधिकाऱ्यांची बैठक निर्मला सीतारामन या घेणार असल्याचे म्हटले आहे. टॅक्सचोरी रोखण्यासाठी, जीएसटी कराची योग्य अंमलबजावणी होण्यासाठी व तसेच 'इज ऑफ डुईंग बिझनेस ' धोरणासाठी किचकटपणा घालवून करप्रणाली चे सुलभीकरण करण्यासाठी ही परिषद अर्थमंत्र्यांकडून घेण्यात येणार आहे.
सध्या आवश्यक त्या करप्रणालीतील गरजा, आव्हाने, भविष्यातील तरतूद अशा बहुउद्देशीय चर्चेसाठी ही परिषद बोलावली जाणार असून संबंधित जीएसटी अधिकाऱ्यांना यासंबंधी मार्गदर्शन केले जाईल. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार ही चार तारखेला आयोजित केले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या मार्गदर्शनात आपले प्रास्तविक ठेवतील.
दरवर्षी जीएसटी काऊन्सिलची बैठक होत जीएसटीवर वेळोवेळी चर्चा करण्यात येते. सध्याच्या धोरणांची अंमलबजावणी व भविष्यातील आवश्यक बदल अशा अनेक बाबतीत अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यावर बैठक होत असते. यानंतर आता जीएसटी अंमलबजावणी अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना उपस्थितांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
सुधारित व कराचे सुलभीकरण झाल्याने यंदा जीएसटी संकलनात (कलेक्शनमध्ये) मोठी वाढ झाली असल्याचे मध्यंतरी सरकारने आपल्या अहवालात स्पष्ट केले होते.