फेब्रुवारीमध्ये १ लाख, ३३ हजार, २६ कोटींचे ‘जीएसटी’ संकलन

मासिक ‘जीएसटी’ संकलन

    02-Mar-2022
Total Views | 73

GST
 
 
नवी दिल्ली : फेब्रुवारी महिन्यात ‘जीएसटी’ अर्थात वस्तू आणि सेवा करापोटी एकूण १ लाख, ३३ हजार, २६ कोटी रुपये महसूल संकलित करण्यात आला आहे. यामध्ये ‘सीजीएसटी’ अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी २४ हजार, ४३५ कोटी रुपये, ‘एसजीएसटी’ अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी ३० हजार, ७७९ कोटी रुपये, ‘आयजीएसटी’ ६७ हजार, ४७१ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी जमा झालेले ३३ हजार, ८३७ कोटी रुपये धरून) आणि अधिभार १० हजार, ३४० कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवरील करापोटी संकलित झालेले ६३८ कोटी रुपये धरून) यांचा समावेश आहे.
सरकारने नियमित सामंजस्य म्हणून ‘आयजीएसटी’मधून २६ हजार, ३४७ कोटी रुपये ‘सीजीएसटी’ला आणि २१ हजार, ९०९ कोटी रुपये ‘एसजीएसटी’ला दिले आहेत. सर्व देणी दिल्यानंतर, फेब्रुवारी २०२२ मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना अनुक्रमे ‘सीजीएसटी’पोटी ५० हजार, ७८२ कोटी रुपये आणि ‘एसजीएसटी’पोटी ५२ हजार, ६८८ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात संकलित झालेल्या ‘जीएसटी’ महसुलापेक्षा फेब्रुवारी २०२२ मध्ये १८ टक्के अधिक महसूल गोळा झाला आहे. फेब्रुवारी २०२० मधील ‘जीएसटी’ संकलनापेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्यात २६ टक्के अधिक ‘जीएसटी’ संकलित झाला आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये आयात केलेल्या वस्तूंवरील करापोटी ३८ टक्के अधिक महसूल जमा झाला असून देशाअंतर्गत व्यवहारांमधून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षी याच महिन्यात याच स्रोतांद्वारे संकलित महसुलापेक्षा १२ टक्के अधिक आहे.
फेब्रुवारी हा २८ दिवसांचा महिना आहे. त्यामुळे दरवर्षीच या महिन्यातील ‘जीएसटी’ संकलन जानेवारी महिन्यापेक्षा नेहमीच कमी असते, हे लक्षात घेतले पाहिजे. या वर्षी २० जानेवारीच्या दरम्यान देशात आलेल्या ‘ओमिक्रॉन’ विषाणू संसर्गाच्या लाटेमुळे विविध ठिकाणी लावावी लागलेली अंशतः टाळेबंदी, सप्ताहाच्या शेवटी तसेच रात्री लागलेली संचारबंदी आणि लागू झालेले इतर प्रतिबंधात्मक नियम यासंदर्भात हे फेब्रुवारी महिन्यातील ‘जीएसटी’ संकलनातील वाढ लक्षात घ्यायला हवी.
मासिक ‘जीएसटी’ संकलनाच्या आकडेवारीने या वर्षात पाचव्यांदा १.३० लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात ‘जीएसटी’ लागू झाल्यापासून पहिल्यांदाच ‘जीएसटी’ अधिभार संकलनाने (टॅक्स सरचार्ज) दहा हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यातून अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक व्यवहार विशेषतः वाहन उद्योगातील विक्री पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.
 
महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ महसूल संकलनात २१ टक्क्यांची वाढ
 
फेब्रुवारी २०२१ मध्ये महाराष्ट्रात १६ हजार, १०४ कोटी रुपये, तर गोव्यात ३४४  कोटी रुपये ‘जीएसटी’ महसूल संकलन झाले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये महाराष्ट्रात १९ हजार, ४२३ कोटी रुपये आणि गोव्यात ३६४ कोटी रुपये ‘जीएसटी’ महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या ‘जीएसटी’ महसूल संकलनात २१ टक्के, तर गोव्याच्या महसूल संकलनात सहा टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा
ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

ऑपरेशन सिंधू सुरुच! आतापर्यंत ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले, इराणमधून तिसरे विमान नवी दिल्लीत दाखल!

(Iran-Israel War) इराण आणि इस्त्रायलमध्ये सशस्त्र संघर्ष सुरु झाल्यापासून इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही देशांतील संघर्ष तीव्र होत असल्याचे लक्षात घेता भारताने युद्धग्रस्त इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' (Operation Sindhu)राबवत नागरिकांच्या सुरक्षित परतीची जबाबदारी घेतली आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत इराणमधील ५१७ भारतीय नागरिक मायदेशी परतले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121