‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरुच, २० कोटींचा टप्पा केला पार

    11-Jun-2024
Total Views | 36
 
Munjya
 
 
 
मुंबई : आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या हा चित्रपट ७ जून रोजी प्रदर्शित झाला. कोकणातील जुन्या परंपरेवर आधारित या चित्रपटाचे कथानक असून हॉरर-कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. तसेच, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई केली असून २० कोटींचा टप्पा पार केला आहे.
 
'मुंज्या' या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४ कोटी, दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ८ कोटी, चौथ्या दिवशी ४ कोटी कमवत आत्तापर्यंत २३.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
 
 
 
महाराष्ट्रातील विशेषत: कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत मुंज्या या हॉरर चित्रपटाचे कथानक रेखाटले आहे. या चित्रपटात शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह यांच्याबरोबरच सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केलं आहे.‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121