मुंबई: फेब्रुवारी २०२४ मध्ये सरकारच्या सकल जीएसटी टॅक्स संग्रहात (कलेक्शन)वाढले आहे. सकल गुड्स सर्विसेस टॅक्समध्ये मोठी वाढ झाली आहे. जीएसटी कलेक्शन १६८३३७ कोटी रूपयांपर्यंत पोहोचून इयर ऑन इयर बेसिसवर (वर्षांनुवर्षे) आधारित १२.५ टक्क्याने जीएसटीत वाढ झाली आहे. अधिकृत माहितीनुसार,आयात केलेल्या उत्पादने व वाढलेला घरगुती व्यवहारांच्या आधारावर हे कलेक्शन वाढले आहे.
अधिकृत माहितीनुसार, जीएसटी करात फेब्रुवारी २४ मध्ये १२.५ टक्क्याने वाढ झाली असून आर्थिक वर्ष २०२२ - २३ मध्ये १.६७ लाख कोटींचे कलेक्शन वाढले आहे. आर्थिक वर्ष २२-२३ मध्ये हे कलेक्शन १.५ लाख कोटींवर होते. एकूण महसूलात मागील वर्षाच्या १३ टक्क्यांचा तुलनेत म्हणजेच १६.३७ लाख कोटींच्या तुलनेत यंदा ही वाढ १३.६ टक्क्याने वाढत १.५१ लाख कोटींवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रातील जीएसटी वाढीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २१ % ने कलेक्शन वाढले आहे. मागील वर्षी जीएसटी कलेक्शन मूल्य २२३४९ वरून यंदा २७०६५ कोटी रूपयांवर पोहोचले आहे. अर्थमंत्रालयाच्या माहितीनुसार एकूण देशातील जीएसटीत १४ टक्क्याने वाढ झाली आहे.
फेब्रुवारी 2024 संग्रहांचे (कलेक्शन) वर्गीकरण
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): ३१७८५ कोटी
राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): ३९६१५कोटी
एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): ८४०९८ कोटी, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या ३८५९३ कोटींचा समावेश आहे.
उपकर: १२८३९ कोटी, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा झालेल्या ९८४ कोटींचा समावेश आहे.
फेब्रुवारी २०२४ पर्यंत, चालू आर्थिक वर्षातील एकूण GST संकलन १८.४० लाख कोटी आहे, जे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील याच कालावधीतील संकलनापेक्षा ११.७ % जास्त आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी सरासरी मासिक सकल संकलन १.६७ लाख कोटी आहे, जे मागील वर्षाच्या संबंधित कालावधीत गोळा केलेल्या १.५ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. चालू आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी २०२४ पर्यंत परताव्याचे GST महसूल १६.३६ लाख कोटी आहे जे मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३ टक्के वाढले आहे.
एकूणच, जीएसटी महसुलाचे आकडे सतत वाढीचा वेग आणि सकारात्मक कामगिरी दर्शवतात.