लुईस फिलिपकडून आकर्षक 'रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शन लाँच

प्रत्‍येक प्रसंगासाठी डिझाइन केलेले प्रिमिअम पोशाख

    23-Feb-2024
Total Views |

Aditya Birla Fashion
 
 
मुंबई: लुईस फिलिप या आदित्‍य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडच्‍या भारतातील प्रिमिअम मेन्‍सवेअर ब्रॅण्‍ड रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शन लाँच होत आहे. ही विशेष श्रेणी प्रत्‍येक नवरदेवाला त्‍याच्‍या जीवनातील खास दिवशी राजेशाहीचा अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत, जी कालातीत अभिजातपणा आणि समकालीन आकर्षकतेचे प्रतीक आहे.
 
लुईस फिलिपचे 'रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शन प्री- वेडिंग फोटोशूट्सपासून रिसेप्‍शन समारोहापर्यंत विवाह सोहळ्याच्‍या प्रवासामधील प्रत्‍येक महत्त्वपूर्ण प्रसंगाची पूर्तता करते. आकर्षक थ्री-पीस सूट्स, आकर्षक बंदी, चमकदार बंधगला आणि ग्‍लॅम टक्सिडो असलेले प्रत्‍येक पोशाख विशेष स्‍टायलिश लेपल्‍ससह गडद काळ्या रंगामध्‍ये डिझाइन करण्‍यात आले आहे, तसेच सॅटिन शर्टससह कन्‍सील पॅकेट्स आणि बीज्‍वेल कॉलर्स आहेत. सर्वोत्तम कच्‍च्या साहित्‍यापासून डिझाइन करण्‍यात आलेल्‍या या कलेक्‍शनमध्‍ये वैविध्‍यपूर्ण कलर पॅलेटसह भव्य ज्‍वेल टोन्‍स जसे ब्‍ल्‍यू, मरून, वाइन व टील यासोबत आकर्षक रंगसंगती जसे क्रीम व क्‍वॉर्टझ पिंक यांचा समावेश आहे, जे कोणत्‍याही प्रसंगामध्‍ये शाही मोहकतेची भर करतात.
 
लुईस फिलिपच्‍या सीओओ फरिदा कलियादान म्हणाल्‍या, '' सर्वजण विवाह सीझनचा आनंद घेण्‍यास सज्ज असताना आम्‍हाला आमचे 'रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शन लाँच करण्‍याचा आनंद होत आहे, जे नवरदेवाला त्‍याच्‍या जीवनातील खास दिवशी अस्‍सल शाही अनुभव देण्‍यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. प्रत्‍येक पोशाख राजेशाही अनुभव मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी बारकाईने डिझाइन करण्‍यात आला आहे. या कलेक्‍शनसह लुईस फिलिपने विवाह पोशाखांच्‍या खरेदीसाठी पसंतीचा ब्रॅण्‍ड म्‍हणून आपले स्‍थान अधिक दृढ केले आहे. हे कलेक्‍शन अद्वितीय दर्जा व डिझाइन देते.''
 
लुईस फिलिपच्‍या 'रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शनला विशिष्ट ठरवणारी बाब म्‍हणजे सुपर-प्रिमिअम फॅब्रिक्‍सचा वापर, ज्‍यामध्‍ये आकर्षक सिल्‍क ब्‍लेण्‍ड्स व लक्‍झरीअस वेल्‍वेट्सपासून सर्वोत्तम वूलन टेक्‍स्‍टाइल्‍सचा समावेश आहे. बारीकसारीक गोष्‍टींमधून उत्तम कारागिरी दिसून येते, ज्‍यामध्‍ये जॅक्वार्डस्, हाताने केलेल्‍या भरतकामासह चमकदार असेंट्स, 'झरी' कलाकृती आणि बारकाईने विणलेले मोती यांचा समावेश आहे. प्रत्‍येक पोशाखामधून अद्वितीय आकर्षकता व भव्‍यता दिसून येते, ज्‍यामुळे लुईस फिलिप विवाह पोशाखाच्‍या खरेदीसाठी प्रमुख गंतव्य बनले आहे.
 
लुईस फिलिपचे 'रॉयल इंडियन वेडिंग' कलेक्‍शन आता मुंबईतील 11 लुईस फिलिप फ्लॅगशिप स्‍टोअर्स, अधिकृत रिटेलर्स, ऑनलाइन आणि ब्रॅण्‍डच्‍या मोबाइल अॅपच्‍या माध्‍यमातून उपलब्‍ध आहे.