महाशिवरात्रीचा 'शैतान'ला फायदा, पहिल्याच दिवशी अपेक्षेपेक्षा अधिक कमाई
09-Mar-2024
Total Views |
अजय देवगण आणि आर. माधवन अभिनिती शैतान चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी दमदार कमाई.
मुंबई : अभिनेता अजय देवगण आणि आर माधवन यांनी पहिल्यांदाच एकत्रित काम केलेल्या 'शैतान' (Shaitaan) चित्रपटाला चांगलेच यश मिळृताना दिसत आहे. ८ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा अधिक कमाई केली आहे. इतकेच नव्हे तर, या (Shaitaan) चित्रपटाची प्रदर्शनापुर्वी देखील अॅडव्हान्स बुकिंगमध्ये १.७६ लाखांहून अधिक तिकिटे विकून ४.१४ कोटी रुपयांची कमाई केली होती.
‘शैतान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी किती कमाई केली त्याची आकडेवारी समोर आली आहे. सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने १४.५० कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, ‘शैतान’ चित्रपटाच्या समोर कोणताही मोठा अन्य चित्रपट प्रदर्शित झाला नसल्यामुळे देखील या चित्रपटाला चांगले यश मिळत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. शिवाय, महिला दिन आणि महाशिवरात्री देखील फायदा 'शैतान'ला झाला आहे. आता विकेंडचा फायदा करत हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. ‘शैतान’ चित्रपटाची कथा एका कुटुंबाभोवती फिरते. एक अनोळखी व्यक्ती अचानक अजय देवगणच्या घरी येतो आणि रहस्यमयरित्या सर्व गोष्टी स्वत:च्या वशीकरणात करुन घेतो असे दाखवण्यात आले आहे.