पंतप्रधानांनी ‘BeerBiceps’ फेम रणवीरला विशेष पुरस्कार देत म्हटले, “तू तर बीजेपीवाला…”

    09-Mar-2024
Total Views |
सोशल मीडिया, यूट्यूब आणि विशेषत: पॉडकास्टच्या विश्वात ‘BeerBiceps’ अर्थात रणवीर अलाहबादीया हे नाव नावाजलेले आहे.
 
 
modi and ranveer
 
नवी दिल्ली : जागतिक महिला दिनादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते पहिल्या ‘नॅशनल क्रिएटर’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डिजीटल युगात फेसबूक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा वेगवेगळ्या माध्यमांमधून जे नवे इन्फ्लुएन्सर्स आपल्यासोमर त्यांच्या कला किंवा विविध विषय मांडत आहेत त्यांचा सत्कार या पुरस्काराद्वारे करण्यात आला. यावेळी यूट्यूबवरील ‘बीयर बायसेप’ (BeerBicep) या चॅनलचा सर्वेसर्वा रणवीर अलाहबादीया यालाही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ‘Disruptor of the Year’ हा पुरस्कार देण्यात आला. यावेली त्याच्याशी (BeerBiceps ) संवाद साधताना मोदींनी त्याला, “तू बीजेपीवाला आहेस झाला आहेस”, असे म्हटले.
 
हे वाचलंत का? - “निशिकांत कामत यांचा विश्वास आणि दृश्यममधील गायतोंडे भूमिका पदरात पडली”  
 
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या कामाला प्रोत्साहन देत त्यांना सन्मानित करण्यासाठी नॅशनल क्रिएटर्स पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे. दिल्लीच्या भारत मंडपमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी रणवीरला पुरस्कार देताना नरेंद्र मोदींनी विनोदी शैलीत फिरकी घेत म्हटले, “फिटनेसविषयी तरुणांना काय कानमंत्र देशील?” असा प्रश्न विचारला तेव्हा रणवीर म्हणाला, “मी लोकांना एकच गोष्ट सांगेन की त्यांनी योगा आणि मेडिटेशन याचा सराव करावा आणि त्यावर अधिक भर द्यावा.”
 
 
 
रणवीरच्या या उत्तरावर पुन्हा पंतप्रधान म्हणाले, “असं केलं तर लोक म्हणतील की, तू मोदीजी यांची गोष्ट सांगत आहेस, तू बीजेपीवाला आहेस झाला आहेस असं लोक म्हणतील.” मोदीजी यांच्या या वाक्यावर रणवीर मनमुराद हसला. आता याचा नेमका अर्थ काय हे येणारा काळ ठरवेल.