
मुंबई: अंतराळ क्षेत्रातील यशस्वी झालेले प्रयाण असो किंवा अंतराळ क्षेत्रातील एफडीआय ( परदेशी गुंतवणूक) १०० टक्के करण्याचा निर्णय, पंतप्रधानांनी संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देण्याच्या पुढील टप्प्यात आता इंडियन एअर फोर्सने लार्सन ट्युब्रोकडून हाय पॉवर रडार व क्लोज इन व्हेपन प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी खरेदी करण्याचे ठरवले आहे. यासाठी आयएएफ (इंडियन एअरफोर्स) कडून १३००० कोटी खर्च केले जाणार आहे. यासाठी संरक्षणाच्या कॅबिनेट शिष्टमंडळाने मंजूरी दिली असून पाकिस्तान व चीनशी असलेल्या सीमांवर संरक्षण देखरेख वाढवण्यासाठी ही उपकरणे विकत घेतली जातील.
याशिवाय ६००० कोटींची नवीन रडार एअरफोर्स विकत घेऊन यापूर्वीची रडार रद्दबादल करणार आहे. एअरफोर्सचा आधुनिकीकरणाची ही एक पायरी समजली जाते. कॅबिनेट शिष्टमंडळाने याखेरीज ७००० कोटींची व्हेपन प्रणाली खरेदी केली आहे. मुख्यतः ही ' मेड इन इंडिया ' असणार आहे. ड्रोन एअरक्राफ्टच्या माध्यमातून संरक्षण मजबूत करण्यासाठी ही यंत्रप्रणाली वापरली जाईल. ही यंत्रणा लार्सन ट्युब्रोकडून बनवण्यात येणार आहे. आगामी काळात देखील संरक्षणार्थ याहून अधिक खर्च खंदे सरकार खर्च करण्याची शक्यता आहे. यामुळे संरक्षण क्षेत्रातील अधिकच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
याशिवाय 'मिशन ब्रम्होस' चा भाग म्हणून सरकार नवीन २००० ब्रम्होस मिसाईल १९००० कोटींना खरेदी केली जातील. मिसाईल नुतनीकरणासाठी व खरेदीसाठी सरकार १९००० कोटी रुपये खर्च करणार आहे. ब्रम्होस एरोस्पेस हा भारत रशियाचा संयुक्त प्रकल्प आहे. यामाध्यमातून सबमरिन, एअरक्राफ्ट क्रुझ, मिसाईल यासाठी हे बनवण्यात येणार आहे